Share

पुनम महाजनांनी नामर्द म्हटल्यानंतर संजय राऊत संतापले; म्हणाले, भाजपमध्ये पुनम महाजनांचं..

Sanjay-Raut & Poonam-Mahajan.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी भाजपवर टीका करताना बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांचं एक जुनं व्यंगचित्र ट्विटरवर शेअर केलं होत. हे व्यंगचित्र पाहून भाजपच्या नेत्या पूनम महाजन(Punam Mahajan) यांना संताप अनावर झाला होता. “स्वर्गीय बाळासाहेब व स्वर्गीय प्रमोदजी, या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली होती. नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका”, अशा शब्दांत पुनम महाजन यांनी खासदार संजय राऊत यांना सुनावलं होत.(sanjay-raut-answer-to-punam-mahajan)

यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “भाजप नेते प्रमोद महाजन(Pramod Mahajan) यांच्यावरील कार्टुन हे महाजनांवर व्यक्तिगत टीका करणारं नव्हतं. त्या काळात भाजप आणि शिवसेनेची काय ताकद होती हे अधोरेखित करणारं हे ट्विट होतं”, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.

“भाजप नेत्यांनी केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर ते कार्टुन पोस्ट केलं होतं. हे ट्विट डिलीट केलं असलं तरी जिथे पोहोचायचं तिथे पोहोचलं आहे. लोकांनी पोहोचवलं आहे. पूनम महाजन सध्या कुठे आहेत? त्यांचं भाजपशी काय नातं आहे?”, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सध्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यंगचित्राचे ते ट्विट काढून टाकले आहे.

“ते कार्टून मी काढलं नाही. आरके लक्ष्मण यांनी काढलं आहे. त्यावेळी शिवसेना काय होती हे त्यातून दिसतं. मी व्यक्तिगत रित्या प्रमोद महाजनांवर टीका केली नाही. ते भाजपचे नेते होते. बाळासाहेब त्यांच्यावर प्रेम करायचे. पूनम आता कुठे आहेत? मला माहीत नाही”, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.

“भाजपमध्ये महाजन परिवार, मुंडेंचं कुटुंब असो की मनोहर पर्रिकराचं कुटुंब असेल सर्वांना अंधारात ढकललं आहे. त्यामुळे भाजपमध्ये तुम्ही कुठे आहात? हे मी पूनम यांना विचारू इच्छितो. पण मी त्यांची टीका वैयक्तिक घेत नाही. त्यांना माझं म्हणणं आवडलं नसेल, त्यांच्या वडिलांबाबत तर मीही अस्वस्थ आहे. कारण महाजन कुटुंबाशी माझे चांगले संबंध आहे”, असे देखील संजय राऊत म्हणाले आहेत.

“दिल्ली काबीज कारण्यासंबंधी बाळासाहेब थोरात यांनी केलेलं वक्तव्य योग्य आहे. दिल्ली काबीज करणं म्हणजे सर्व पक्षांना एकत्र घेऊन भाजपला सत्तेतून हटवणं. त्यालाच दिल्ली काबीज करणं म्हणतात. आज एक दोन व्यक्तिंच्या हातात दिल्ली आहे. दिल्लीवर देशाचं वर्चस्व पाहिजे. दिल्ली देशाची आहे. एखाद्या राजकीय पक्षाची किंवा एखाद्या दुसऱ्या व्यक्तिची नाही”, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी भाजपला ठणकावले.

महत्वाच्या बातम्या :-
संजय राऊतांच्या ट्विटवर पूनम महाजन भडकल्या, नामर्द म्हणत राऊतांना झापले, घाबरलेल्या राऊतांनी…
धक्कादायक! महंत गुरू म्हणाला ‘मी अमर आहे’, परिक्षा घेण्यासाठी शिष्याने केले गुरूवर सपासप वार
पुष्पा चित्रपटातील अल्लू अर्जुनप्रमाणे करत होते लाल चंदनाची तस्करी, ५५ मजुरांसह ३ मोठ्या तस्करांना अटक

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now