Share

“सरकारला राज ठाकरेंची भीती वाटते”; काँग्रेस नेत्याचा सरकारला घरचा आहेर

udhav thackeray

राज्यात तीन वेगळ्या पक्षानी मिळून स्थापन झालेले महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत आहे. यातील प्रामुख्याने एक मुद्दा म्हणजे ठाकरे सरकारमधील नाराजीनाट्य. हे सांगण्याच कारण म्हणजे पुन्हा एकदा ठाकरे सरकारमधील नाराजीनाट्य समोर आलं आहे.

महाविकास आघाडीत सत्तेत असलेल्या काँग्रेस नेत्याने थेट सरकारला घरचा आहेर दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना राज्य सरकार घाबरले आहे. त्यामुळे १ मेच्या औरंगाबाद सभेसाठी शर्तींचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला.

ते याबाबत माध्यमांशी बोलत होते. राज्य सरकारने मशिदीवरील भोंगे हटवले नाही तर मशिदींसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालिसा वाजवली जाईल असा इशारा राज ठाकरे यांनी सभेत बोलताना दिला होता. मनसेच्या भूमिकेला पाठिंबा देत विरोधकांनीही ठाकरे सरकारवर टीका केली.

मात्र असे असतानाच कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांनी सरकारला घरचा आहेर दिल्याने पुन्हा एकदा सरकारमधील नाराजी उघडकीस आली आहे. सरकारने राज ठाकरेंना घाबरु नये, कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्यांवर कठोरपणे कारवाई करावी, असं देखील निरुपम म्हणाले.

दरम्यान, औरंगाबादमध्ये मनसेला सभा घेण्यासाठी पोलिसांनी अटी घातल्या होत्या, पोलिसांनी दिलेल्या 18 अटींपैकी राज यांनी १२ नियमांचे उल्लंघन केले आहे. याशिवाय दोन कोर्टाने राज यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. तरीदेखील महाराष्ट्र पोलीस कोणतीच कारवाई का करत नाही, असा संतप्त सवाल निरुपम यांनी उपस्थित केला.

दरम्यान, ‘जो कोणी कायद्याला आव्हान देईल त्यांच्यावर कठोर कारवायी केली पाहिजे,’ असंही निरुपम यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे. तर दुसरीकडे निरुपम यांनी सरकारवरच केलेल्या टीकेमुळे पुन्हा एक नाराजी समोर आली आहे. यावर अद्याप सरकारमधील नेत्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या नाहीये.

महत्त्वाच्या बातम्या
“महागाईचा भोंगा वाजला, ५० रूपयांनी गॅस वाढला, अरे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?”
“एवढं नक्की सांगतो, पुढच्यावेळी आढळराव पाटील संसदेत असतील”; राऊतांनी कोल्हेंचे टेंशन वाढवले
नवनीत राणा एका मोठ्या आजाराने त्रस्त; MRI रिपोर्टमधून झाला मोठा खुलासा
६४ वर्षांपासून चित्रपटसृष्टीची शान आहे ‘मराठा मंदिर’, सेक्स वर्कर-ट्रान्सजेंडर्सना मिळते खास सुविधा

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now