Share

‘…तर चुन चुनके, गिन गिनके मारेंगे,’ शिंदे गटातील आमदाराने थेट ठाकरे गटाला दिलं आव्हान

सध्या राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेनेतील ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट हा वाद आता मुद्द्यांवरून गुद्यांवर पोहोचला आहे का? असा सवाल सध्या राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. याचे कारण असे की, काल शिवसेनेच्या (Shiv sena) कार्यक्रमात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तुफान गोंधळ घातला.

या घटणेनंतर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आक्रमक भूमिका घेत ठाकरे गटाला एक इशारा दिला आहे. ‘ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि नेते पातळी सोडून बोलत असल्याच गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना म्हंटलं आहे. यामुळे आता शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात वादाची ठिणगी पडली असल्याच बोललं जातं आहे.

गायकवाड यांनी म्हंटलं आहे की, ‘ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि नेते पातळी सोडून बोलत आहेत. पण त्यांना माहिती नाही की शिवसेनेच्या संजय गायकवाडांचे कार्यकर्ते किती भयानक आहेत. ते आम्हाला घरात घुसून मारण्याची धमकी देतात पण ते आता जर शिंदे विरोधात बोलले तर आम्ही त्यांना चुन चुनके आणि गिन गिनके मारेंगे.” असा इशारा गायकवाड यांनी दिला.

वाचा नेमकं प्रकरण काय?

हा संपूर्ण प्रकार बुलढाण्यातील आहे. शनिवारी (काल) दुपारी एक वाजेच्या सुमारास उद्धव ठाकरे गटाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात शिंदे गटाच्या समर्थकांनी थेट आतमध्ये घुसत हल्ला करून तोडफोड केली. अखेर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र आणि कार्यकर्ते इथं आल्यानं कार्यकर्तेही  पोलिसांसमोरच एकमेकांना भिडले. या कार्यक्रमास शिवसनेचे उपनेते लक्ष्मण वडले, जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

मिळालेल्या माहितीनुसार, हा कार्यक्रम सुरू होत असतानाच शिवसेनच्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी बाजार समितीमध्ये प्रवेश करत थेट सभागृह गाठून तेथे उपस्थित उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनासह कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली. यामुळे काहीकाळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

महत्वाच्या बातम्या

बंडखोर शिवसेना मंत्र्याने शड्डू ठोकला! उद्या गुवाहाटीहून मतदासंघात येत घेणार जाहीर सभा
ईडीच्या कारवाईमुळे आमदारांनी बंड केलं? दीपक केसरकर म्हणाले, १,२,३…
‘मुलांना जिथे जायचे तिथे जाऊ दे, मी मरेपर्यंत शिवसेनेसोबतच’; बंडखोर आमदाराच्या वडीलांनी ठणकावले
शमशेराची स्टोरी झाली लीक, ‘अशी’ असेल रणबीर कपूर आणि संजय दत्तची भूमिका, वाचून वाढेल उत्सुकता
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now