Share

sanjay raut : मादर** संजय राऊत तु यापुढे…; राऊतांवर शिंदे गटातील ‘हा’ आमदार आक्रमक, माध्यमांसमोर केली शिवीगाळ

sanjay raut

sanjay gaikwad angry on sanjay raut  | एकनाथ शिंदे यांनी आणि ४० आमदारांनी बंडखोरी करत नवीन सरकार स्थापन केले. त्यामुळे ठाकरे गटातील नेत्यांकडून त्यांच्यावर वारंवार टीका केली जात आहे. तसेच टीकेला शिंदे गटातील आमदार प्रत्युत्तरही देताना दिसून येत आहे. पण त्यांची भाषा खुपच आक्रमक असल्याचे दिसत आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत नाशि दौऱ्यावर असताना त्यांनी शिंदे गटातील आमदारांवर टीका केली होती. चित्रपटांमध्ये जसं अमिताभ बच्चन यांच्या हातावर मेरा बाप चोर हे असं कोरलं आहे. तसेच शिंदे गटातील आमदारांच्या कपाळावर गद्दार असं कोरलं आहे. याचा त्रास त्यांना अनेक पिढ्या होईल, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

आता या टीकेला शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पण यावेळी प्रत्युत्तर देताना संजय गायकडवाडांची जीभ घसरली आहे. संजय राऊतांवर टीका करताना संजय गायकवाडांना माध्यमांसमोर थेट शिवीगाळ केली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आम्ही गद्दारी केलेली नाही, तर उठाव केला आहे. त्याचा आमच्या पुढच्या पिढ्यांनाही अभिमान असेल. त्यामुळे मादर** संजय राऊत तु यापुढे अशी भाषा वापरु नकोस. राहिला प्रश्न पडायचा कि निवडायचा तर आमचा निर्णय जनतेला मान्य आहे, असे संजय गायकवाड यांनी म्हटले आहे.

तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेली हातमिळवणी जनतेला मान्य नाही. शिवसेना-भाजप म्हणून लोकांनी तुम्हाला निवडून दिलं होतं. अमिताभ बच्चनचा डायलॉग चित्रपटासाठी ठीक आहे. पण महाराष्ट्रात तुमच्या किती जागा निवडून येतात किंवा तुमच्या किती जागा निवडून येताता ते पण बघू, असे संजय गायकवाड यांनी म्हटले आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटातील नेते खुपच आक्रमक, खालच्या दर्जाची आणि शिवीगाळाची भाषा वापरताना दिसून येत आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार, रामदास कदम यांनीही शिवीगाळ करत नेत्यांवर टीका केली होती. अशात संजय गायकवाडांनी राऊतांवर टीका केली आहे. त्यामुळे आता त्यांना राऊत काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

महत्वाच्या बातम्या-
sushma andhare  : सुषमा अंधारे काहीही बोलते, तिच्या मेंदूला नारू झालाय…, तिला बोलायला ठेवलय की भुंकायला?
Sanjay Raut : उदयनराजे शिवसेनेत प्रवेश करणार? संजय राऊतांच्या विधानाने राजकारणात खळबळ
बांगलादेश दौऱ्यापूर्वी टीम इंडियात मोठे फेरबदल, BCCI ने जाहीर केले 2 नवे संघ

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now