Share

ड्रग्स घेऊन मला कुल वाटायचं, मग मी बिनधास्तपणे मुलींसोबत.., संजय दत्तचा मोठा खुलासा

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त सध्या त्याच्या ‘KGF2’ चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. चित्रपटाच्या निमित्ताने त्याला अनेक मुलाखतींना उपस्थिती लावावी लागत आहे. दरम्यान, एका मुलाखतीत संजय दत्तने त्याच्या भूतकाळातील एका घटनेचा खुलासा केला, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

संजय दत्त याचं आयुष्य हे अनेक चढ- उतारांनी भरलेले आहे, याची माहिती सर्वांनाच आहे. संजय दत्तने सध्या बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या ‘KGF2’ मध्ये अभिनय केला आहे. हा चित्रपट जबरदस्त कमाई करत आहे. यामुळे चित्रपटात काम करणाऱ्या अनेक कलाकारांची मुलाखत सध्या होत आहे.

दरम्यान, संजय दत्तची देखील मुलाखत झाली. या मुलाखतीत त्यानं त्याच्या भूतकाळातील एका घटनेबद्दल खुलासा केला. मुलाखतीत त्याला त्या दिवशीची आठवण झाली जेव्हा लोक त्याला ‘चरसी’ म्हणायचे. संजय दत्त पुनर्वसन केंद्रातून परतला होता, तेव्हाची ही घटना संजय दत्तने मुलाखतीत सांगितली.

मुलाखतीत संजय दत्त म्हणाला की, मी खूप लाजाळू होतो, विशेषत: मुलींबाबत, त्यामुळे मी फक्त त्यांच्यापुढे कूल दिसण्यासाठी ड्रग्स घेण्यास सुरुवात केली. ड्रग्स घेऊन, कूल वाटायचे आणि मग मी बिनधास्तपणे मुलींसोबत बोलायचो. ड्रग्स घेतल्यावर मुलींना बोलायला मी लाजत नव्हतो.

संजय दत्त म्हणाला, माझ्या आयुष्यातील 10 वर्षे एका खोली वजा बाथरूममध्ये गेली. मला शूटिंगमध्ये काहीच रस नव्हता. माझ्या आयुष्यात ड्रग्समुळे सर्व काही बदलले. जेव्हा मी पुनर्वसन केंद्रातून बाहेर पडून घरी परत आलो, तेव्हा लोक मला चरसी म्हणू लागले. मला खूप वाईट वाटायचं.

हे सगळं थांबवण्यासाठी काहीतरी करायला हवं असं नेहमी वाटायचं. मग मी वर्कआउट करू लागलो. मला माझी इमेज बदलायची होती. मग मी हळूहळू माझ्यात बदल केला. त्यानंतर लोक मला म्हणू लागले,’वाह काय शरीर आहे’. मी त्यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती, असे तो म्हणाला.

संजय दत्त ‘KGF2’ या चित्रपटात ‘अधीरा’ ही भूमिका साकारत आहे. KGF2’ हा चित्रपट प्रशांत नील यांनी दिग्दर्शित केला असून, हा चित्रपट तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित झाला. यामध्ये संजय दत्त व्यतिरिक्त यश, रवीना टंडन, प्रकाश राज, मालविका अविनाश, जॉन कोकेन असे अनेक कलाकार आहेत.

मनोरंजन बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now