“तू ठाकरे है तो मैं भी राणा हूं. मी मुंबईची मुलगी आणि विदर्भाची सून आहे. तुम्ही शिवसेनेचे असाल तर मी पण विदर्भाची सून आहे, आमना सामना तर लवकरच होईलच. त्यात कळेल की कोण किती ताकदवान आहे,’ असं अप्रत्यक्षपणे खुलं आव्हानच नवनीत राणांनी दिलं आहे.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा सर्वनाश होणार, अशी टीका खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले होते. या टीकेनंतर शिवसेना प्रवक्त्या संजना घाडी यांनी नवनीत राणांवर आगपाखड केली आहे. आता नवीन वादाला तोंड फुटले आहे.
संजना घाडी यांनी म्हंटलं आहे की, ‘नवनीत राणा आपण कोण आहात “सी”‘ ग्रेड फिल्म मध्ये काम करणाऱ्या एक अभिनेत्री. एक आमदार आपल्यावर भाळला आणि राजकारणात आपला चंचू प्रवेश झाला. जरा तोंड सांभाळून बोला असा थेट इशारा संजना घाडी यांनी दिला आहे.
दरम्यान, पुढे बोलताना संजना घाडी यांनी म्हंटलं आहे की, “मुंबईची मुलगी’ म्हणून घेणाऱ्या बाईला माहिती पाहिजे. ही मुंबईची मुलगी कदाचित त्यावेळी “C” ग्रेड फिल्म करण्यात बिझी होती. आणि आता फड उभा करून कमळाबाईची सुपारी वाजवते, हे महाराष्ट्र आणि मुंबईला पक्के कळाले आहे, अशी टीकाही संजना घाडींनी केली.
तसेच पुढे संजना घाडी यांनी म्हंटलं आहे की, ‘कावळीणीच्या शापाने गाय मरत नसते बाई..! त्यामुळे माझ्या शापामुळे माझ्यावर झालेल्या अन्यायामुळे शिवसेनेला कार्यकर्ता उरला नाही अशा फाजील वल्गना करून थेरं महाराष्ट्राला दाखवू नका,’ असं स्पष्टच संजना यांनी म्हंटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
सत्तेसाठी लाचारी! उद्धव ठाकरेंचा विश्वासघात करून सेनेची ‘ही’ रणरागिणी जाणार शिंदे गटात
अंधेरी विधानसभेसाठी थेट मातोश्रीवरून सूत्र हलली, ‘या’ उमेदवाराला उतरवलं मैदानात, विरोधकांना फुटला घाम