गेल्या काही दिवसांपासून भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्या नात्यावरून वातावरण तापले आहे. घटस्फोट घेतल्यानंतर दोघेही वेगळे होणार असल्याच्या बातम्या येत आहेत. या बातम्या समोर आल्यापासून त्यांचे चाहते नाराज झाले होते. या प्रकरणाशी संबंधित एक मोठी माहिती समोर आली आहे.
तुम्ही सानिया मिर्झा आणि शोएब मलिकचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. दरम्यान, एका जवळच्या सूत्राने दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्यांचे सत्य सांगितले आहे. भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांचे लग्न आता तुटण्याच्या मार्गावर आहे.
पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्समध्ये सातत्याने हा दावा केला जात आहे. पण या अफवांना बळ मिळाले जेव्हा या जोडप्याच्या जवळच्या मित्राचे एक वक्तव्य समोर आले आहे. माध्यमातील वृत्तानुसार, आता दोघेही लवकरच घटस्फोट घेणार आहेत. त्यांच्यामध्ये सर्व काही संपल्यात जमा झाले आहे.
सध्या शोएब मलिक पाकिस्तानमध्ये आहे. तो एका स्पोर्ट्स चॅनलसाठी टी-20 वर्ल्ड कपमध्ये काम करत आहे. तर सानियाने तिची कारकीर्द सुरू ठेवली असुन मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सानिया मिर्झा दुबईत असल्याचे सांगण्यात आले आहे.
सानियाने नुकतीच एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे या चर्चेला आणखी चालना मिळाली आहे. शुक्रवारी सानिया मिर्झाने मुलगा इझानसोबतचा एक गोंडस फोटो शेअर केला आणि लिहिले, ‘मला सर्वात कठीण दिवसांतून घेऊन जाणारे क्षण.
त्याचवेळी, दुस-या मीडिया रिपोर्टमध्ये शोएब मलिकच्या मॅनेजमेंट डिपार्टमेंटच्या एका सदस्याचा हवाला देत घटस्फोट झाल्याचे सांगण्यात आले आहे. या सदस्याने सांगितले की, सानिया आणि शोएबचा अधिकृतपणे घटस्फोट झाला आहे. दोघेही आता वेगळे झाले आहेत.
दरम्यान, सानिया आणि शोएबचे लग्न 12 एप्रिल 2010 रोजी हैदराबादमध्ये झाले. 15 एप्रिल रोजी लाहोरमध्ये रिसेप्शन देण्यात आले होते. दोघांना एक मुलगा इझान आहे. त्याचा जन्म 2018 मध्ये झाला आहे.
महत्वाच्या बातम्या –
Sania mirza : सानिया मिर्झा-शोएब मलिक वेगळे होणार? सानिया मिर्झाच्या ‘त्या’ पोस्टने उडाली खळबळ
Sania Mirza : सानिया मिर्झा-शोएब मलिकच्या नात्यात आलाय दुरावा? सानिया म्हणाली, मी सर्वात वाईट…