Share

sangli : सांगलीतील उत्तरेश्वराच्या यात्रेत विकला ५० लाखांचा बकरा; का मिळतेय एवढी किंमत? कारण वाचून हैराण व्हाल

uttareshwar devachi yatra

uttarshawar yatra goat price | राज्यातील अनेक गावांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जत्रा असतात. त्यामध्ये काही जत्रांमध्ये हैराण करणाऱ्या गोष्टी पाहायला मिळतात. आता सांगलीतील एका जत्रेत सुद्धा असेच काही समोर आले आहे. सांगलीतील आटपाडीत उत्तरेश्वर देवाच्या जत्रेत एक ५० लाखांचा बकरा आला आहे.

आटपाडीमध्ये उत्तरेश्वर देवाची यात्रा भरलेली आहे.या यात्रेत एका बकऱ्याची तब्बल ५० लाख रुपये बोली लागली आहे. माडग्याळ जातीच्या बकरे व मेंढ्यांची ११ ते ५० लाखांपर्यंत किंमत आहे. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारी उत्तरेश्वर देवाच्या यात्रेत सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांसोबतच परराज्यातील शेतकऱ्यांनी आणि व्यापऱ्यांनी सुद्धा हजेरी लावली आहे.

कोरोनानंतर तब्बल २ वर्षानंतर मोठ्या प्रमाणात यात्रा भरत आहे. त्यामुळे व्यापारी आणि शेतकरी सुद्धा या यात्रांमुळे खुप आनंदी आहे. तसेच शेतकरी पशुपालक यांच्या शेळ्या, बोकड, मेंढी, बकरे यांना चांगला दर मिळत असल्याने शेतकरीही समाधान व्यक्त करत आहे.

या यात्रेमध्य १० हजारांपेक्षा जास्त शेळ्या, मेंढ्या विक्रीसाठी आल्या आहे. या यात्रेत महाराष्ट्रासोबतच कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवासारख्या राज्यातून यात्रेत पाच हजारांपासून ५० लाख रुपयांपर्यंत बकऱ्यांची किंमत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या यात्रेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे.

माणदेशातील माडग्याळ जातीच्या बकऱ्याची किंमत खुपच महागात असल्याचे लक्षात येते. या जातीतील सर्वात महाग बकऱ्याची किंमत ५० लाख रुपये आहे. या यात्रेत शेकडो वाहने मेंढ्या-बकऱ्यांची ने आण करत आहे. तर हौशी मेंढपाळ मेंढ्यांचा कळप घेऊन वाजत गाजत यात्रेत फिरत आहे.

माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी या यात्रेचे आयोजन केले आहे. यात्रा व्यवस्थित पार पडावी, यासाठी प्रयत्न करत आहे. त्यांनी कृषी बाजार पंचायत समिती, नगरपंचायत, आटपाडी व्यापारी संघटना, मेंढपाळ, उत्तरेश्वर देवस्थान समिती यांच्यासोबत बैठक घेत सर्व सोयी सुविधांचा आढावा घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या-
Sanjay Raut : “संजय राऊतांच्या मातोश्री या माँ जिजाऊंचं रुप आहे, त्यांनी जन्माला…”
Sanjay Raut : ईडीच्या कारवाईत भेदभाव, राऊतांना विनाकारण अटक झाली; न्यायालयाने ईडीला झाप झाप झापले
जिच्यावर विश्वास टाकला तिनेच धोका दिला! ठाकरेंची आक्रमक वाघिन शिंदे गटात सामील

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now