udhav thackeray : एखादी मुलगी लग्न झाल्यानंतर सासरी जाते तसं सोंग उद्धव ठाकरेंनी वर्षा सोडताना केलं; शिंदे गटाने केला हल्लाबोल

udhav thackeray : शिवसेनेतील दोन्ही गट एकमेकांवर तुटून पडले आहेत. राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिवसेनेत दरी निर्माण झाली आहे. अद्याप शिवसेनेतील वाद मिटलेला नाहीये. तर आता शाब्दिक वाद आता टोकाला गेल्याच पाहायला मिळतं आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटात आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे.

नुकतच राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लक्ष केलं आहे. ‘वर्षा बंगल्यातून बाहेर पडताना एखादी मुलगी लग्न झाल्यानंतर सासरी जाते तसं सोंग उद्धव ठाकरेंनी केले. घराबाहेर रडारडी, पळापळी झाली, अशा शब्दात भुमरे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

ठाकरे गटाला प्रत्युत्तर देण्यासाठी शिंदे गटाकडून हिंदू गर्व गर्जना संपर्क यात्रा सुरू करण्यात आली आहे. या यात्रेतील एका कार्यक्रमादरम्यान बोलताना संदिपान भुमरे यांनी एक मोठा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. नितीन देशमुख यांनीच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचण्याची गळ घातली असल्याच भुमरे यांनी सांगितलं आहे.

भुमरे म्हणाले, ‘एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, नितीन देशमुख यांच्यासह मी होतो. त्यावेळी नितीन देशमुख यांनीच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचण्याची गळ घातली. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून खेचत तुम्ही स्वत: मुख्यमंत्री व्हा, असे देशमुखांनी एकनाथ शिंदेंना म्हटले होते.’

दरम्यान, ‘महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्ष उद्धव ठाकरे कुणाला भेटले नाही. सर्वांनी फक्त त्यांना टीव्हीत पाहिले. आम्हीपण बऱ्याच वेळा टीव्हीत पाहिले. टीव्ही सुरू केली की फक्त उद्धव ठाकरे आम्हाला दिसायचे. मात्र टीव्ही बंद केली की दिसत नव्हते,’ अशी बोचरी टीका भुमरे यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या