uddhav thackeray : शिंदे गटातील मंत्री संदीपान भुमरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून भुमरे हे सातत्याने ठाकरे गटावर निशाणा साधत आहेत. अशातच पुन्हा एकदा त्यांनी निशाणा साधला असून सध्या राजकीय वर्तुळात भुमरे यांच्या वक्तव्याची चर्चा सुरू आहे.
‘उद्धव ठाकरेंनी शंकरराव गडाख या अपक्ष आमदाराकडून पैसे घेऊन जलसंधारण मंत्री आणि पालकमंत्री केलं, असा खळबळजनक आरोप भुमरेंनी केला आहे. ‘सत्ता तुमच्या बापाची आहे का?,’ असा अप्रत्यक्षपणे सवाल देखील भुमरेंनी थेट उपस्थित केला आहे.
भुमरे औरंगाबादमध्ये दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने घेतलेल्या जिल्हा मेळाव्यात बोलत होते. यावेळी बोलताना पुढे भुमरे म्हणाले की, खरे गद्दार तुम्ही आहे. गडाख यांच्यासोबत तुम्ही काय व्यवहार केला हे आम्हाला माहित आहे. उगाच गडाख यांना तुम्ही मंत्री केलं नाही. तुमच्याकडे मंत्री, आमदार होते. तुम्हाला गरज काय होती, गडाखांची?.’
दरम्यान, पुढे बोलताना भुमरे म्हणाले, अपक्ष माणसाला पालकमंत्री केलं, मात्र यांना पालकमंत्री करायला भुमरे दिसला नाही. त्यांना वाटलं नाही की भुमरेंना जलसंधारण द्यावं. मला असं खातं दिलं ज्याला आस्थापनाच नाही. मी कुठं दुसऱ्या जिल्ह्यात गेलो तर कुणी बुकेही घेऊन यायचं नाही.’
पुढे बोलताना भुमरे यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य करताना म्हंटलं आहे की, यांना गोचिड ताळमेळ लागू देत नाही. तत्कालीन मंत्री सुभाष देसाई यायचे आणि आमच्याशी बोलत नसे. आम्ही बोललो की, म्हणायचे मी चाललो मिटींगमधून. अरे आम्ही संघर्ष केला. मात्र यांनी अपक्ष आमदारांना मंत्री केलं.’
महत्वाच्या बातम्या
Sushma Andhare : आमचा दसरा मेळावा गद्दारीविरुद्ध खुद्दारी दाखवणाऱ्या शिवसैनिकांचा असेल; सुषमा अंधारेंचा शिंदे गटाला टोला
raj thackeray : दसरा मेळावा शिवाजीपार्कवर घेण्याच्या भानगडीत पडू नका; राज ठाकरेंनी आधीच दिला होता मुख्यमंत्र्यांना मोलाचा सल्ला
uddhav thackeray : दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार; उद्धव ठाकरेंनी थोपटले दंड अन् मुख्यमंत्री शिंदेंना फुटला घाम
Uddhav Thackeray : दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, परवानगी न मिळाल्यास बाळासाहेबांची ‘ही’ आयडीया वापरणार उद्धव ठाकरे