Share

“असे धमकी देणारे खूप गृहमंत्री आम्ही…”; मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन मनसेचा गृहमंत्र्यांवर पलटवार

raj

गुढीपाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारला इशारा दिला. तुम्ही मशिदीवरील भोंगे नाही उतरवलेत, तर आम्ही भोंगे लावून हनुमान चालिसा सुरु करु, असा गर्भित इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. यावरून आता चांगलच राजकारण तापलं आहे.

तुमच्या भोंग्यांचा आम्हाला त्रास होतो. धर्म निर्माण झाला तेव्हा भोंगे होते का? तुम्ही तुमची प्रार्थना जरुर करा. पण त्याचं सार्वजनिक प्रदर्शन नको, असं राज ठाकरे यांनी म्हंटले होते. त्यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा थेट इशारा दिला.

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले होते, ‘विकासावर बोलायचे सोडून मशिदीवरील अजानवर बोलायचे. हनुमान चालिसावर बोलायचे आणि धर्माधर्मात, दोन वर्गात वाद निर्माण करून राजकारण अस्थिर करायचे काम सुरू आहे. पण यातून राजकारण अस्थिर होणार नाही, तर देश खिळखिळा होवून देशाचे तुकडे यातून पडू शकतात.’

गृहमंत्र्यांच्या या टीकेला मनसेने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे याबाबत प्रतिक्रिया देताना म्हंटले आहे की, “गृहमंत्र्यांनी कायदा कसा राबावायचा हे शिकलं पाहिजे. माझी सन्माननिय दिलीप वळसे-पाटील यांना विनंती आहे की जे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्या आदेशाचं पाहिलं पालन करा.”

“न्यायालयाने भोंगे खाली उतरवण्याचे आदेश दिलेत त्याचं पालन करा मग आम्हाला धमक्या द्या. आम्ही आहोतच आम्ही कुठे जाणार आहोत. अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही,” असंही देशपांडे म्हंटले आहे. तसेच पुढे बोलताना देशपांडे यांनी गृहमंत्र्यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला.

ते म्हणाले, ‘असे धमकी देणारे खूप गृहमंत्री आम्ही बघितले आहेत. आम्हाला त्यांचा फरक पडत नाही. आमची जी मागणी आहे ती कायद्याचं राज्य यावं, कायद्याचं पालन व्हावं ही आहे. त्याचा त्यांनी पहिल्यांदा विचार केला पाहिजे, असे देशपांडे म्हणाले. गृहमंत्र्यांनी आम्हाला दम देण्यापेक्षा कायद्याचं पालन करावं, असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
IPL मध्ये डेब्यु करणारा खेळाडूच निघाला धोनीच्या वरचढ, रिव्ह्यू घेतला अन् धोनीला पाठवलं तंबूत; पहा व्हिडिओ
नाटकासाठी उशीर होऊ नये म्हणून ‘चला हवा येऊ द्या’ मधील ‘या’ अभिनेत्याने केला लोकलने प्रवास, पहा फोटो
लवकरच अंकिता लोखंडेच्या घरीही हालणार पाळणा? लॉकअपमध्ये केला मोठा खुलासा, म्हणाली..

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now