मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणांची नेहमीच राजकीय वर्तुळात तुफान चर्चा होतं असते. अलिकडच त्यांच्या दोन सभा झाल्या आहेत. राज ठाकरे यांनी सभेत मशिदींवरील भोंग्याबाबत केले वादग्रस्त वक्तव्य चर्चेचा विषय बनला आहे. मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसावरुन सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.
या निमित्ताने पुन्हा एकदा शिवसेना – मनसे आमनेसामने आली आहे. राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी ईदचा म्हणजेच ३ मेपर्यंत राज्य सरकारला अल्टीमेटम दिलं आहे.असं न झाल्यास मशिदींसमोर भोंग्यांवर हनुमान चालीसा लावणार असल्याचं राज यांनी स्पष्ट केले आहे.
त्यावरून शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी या भोंग्यांच्या मुद्द्यांवरुन मनसेला लक्ष केले. ‘महागाईबद्दल बोला,’ असा शाब्दिक हल्लाबोल गुरुवारी आदित्य ठाकरेंनी मनसेवर चढवला.
भोंग्यांबाबत मला काही टिप्पणी करायची नाही, पण मनसेने भोंगे लावल्यास त्यावरुन वाढत्या महागाईविषयी जनतेला माहिती द्यावी. पेट्रोल-डिझेल, सीएनजी आणि इतर गोष्टींची दरवाढ कशामुळे झाली हे मनसेने सांगावे, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी मनसेला केले आहे.
यावर आता मनसेने प्रत्युत्तर दिले आहे. ‘महागाईबद्दल, पेट्रोल दरवाढीबद्दल आम्हीच बोलायचं…करोना काळात हे घऱात लपून बसले होते,’ असा अप्रत्यक्ष टोला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी लगावला आहे. त्यांनी फेसबुक पोस्ट करत नाव न घेता शिवसेनेला टार्गेट केले आहे. तसेच देशपांडे यांनी याबाबत माध्यमांशी देखील संवाद साधला आहे.
पोस्टमध्ये देशपांडे म्हणतात, “महागाईबद्दल, पेट्रोल दरवाढीबद्दल आम्हीच बोलायचं…करोना काळात हे घऱात लपून बसले होते आणि कोमट पाणी पिण्याचे सल्ले देत होते तेव्हा लोकांच्या समस्या कृष्णकुंजवर येत होत्या त्या सोडवण्याचं कामही आम्हीच करायचं.’
पुढे देशपांडे म्हणतात, ‘लोकांच्या नोकऱ्या गेल्या त्याचंही आम्ही पहायचं. मग यांनी काय फक्त संपत्ती गोळा करायची आणि पालिकेतल्या टेंडरमधील कमिशन खायचं एवढंच काम आहे का? तेवढ्यासाठीच निवडून दिलंय का? सगळं आम्हीच करायचं तर मग तुम्ही काय झक मारायला सरकारमध्ये बसला आहात?, असे सवाल त्यांनी उपस्थित केले.
महत्त्वाच्या बातम्या
लिंबाचे भाव इतक्या झपाट्याने का वाढत आहे? धक्कादायक कारण आले समोर
भावाच्या लग्नात करिना कपूरची दिसली हटके स्टाईल, रणबीर आलिया झाले पती पत्नी, पहा खास फोटो
राज ठाकरेंच्या घराबाहेर शिवसेनेची बॅनरबाजी, मुस्लिमांप्रमाणे गोल टोली घातलेला फोटो केला व्हायरल
“जेम्स लेन अजूनही जिवंत आहे, शरद पवारांनी त्याला महाराष्ट्रात आणावे आणि कारवाई करून दाखवावी”