Share

samruddhi mahamarg : आधी अपघात झाला आता ट्रक अडकला, बाहेर काढण्यासाठी समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली खोदला खड्डा

truck

samruddhi mahamarg truck stuck | गेल्या काही वर्षांपासून राज्यातील समृद्धी महामार्गाची चर्चा होत होती. अखेर रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या समृद्धी महामार्गाचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यानंतर लोकार्पणाच्या दुसऱ्याच दिवशी एक धक्कादायक बातमी समोर आली होती.

सोमवारी समृद्धी महामार्गावर एक कार अपघात झाला होता. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. पण घटनेला काही तास पण उलटले नाही, तर आता आणखी एक हैराण करणारी बातमी समोर आली आहे. आता समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली ट्रक अडकल्याची घटना समोर आली आहे.

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारातील समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली माल वाहतूक करणारा ट्रक अडकला होता. त्यामुळे ट्रक काढण्यासाठी रस्त्यावर अक्षरश: खड्डा करावा लागला आहे. समृद्धी महामार्ग तयार करताना महत्वाच्या रस्त्यांवर पूल तयार करण्यात आले आहे.

अशात या पुलांची उंची कमी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे माल वाहतूक करणारे ट्रक अडकत असल्याचे समोर आले आहे. कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारातील समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली माल वाहतूक करणारा ट्रक ट्रेलर हा सोमवारी संध्याकाळी अडकला होता.

त्यामुळे हा ट्रक काढण्यासाठी ड्रायव्हरला मोठी कसरत करावी लागली आहे. चेन्नई येथून हा ट्रक धुळ्याकडे नगर-मनमाड मार्गावरुन जात होता. त्यावेळी समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली हा ट्रक अडकला. या ट्रक मोठ्या प्रमाणात अवजड मशीन असल्याने हा ट्रक पुलाखाली अडकला होता.

अखेर त्या मार्गावर खड्डा करुन ट्रकला बाहेर काढण्यात आले आहे. नगर-मनमाड मार्गावर नेहमीच गर्दी असते. त्यामुळे या मार्गावरुन समृद्धी महामार्गाचे दोन वेगवेगळे पुल बांधण्यात आले होते. मात्र या पुलाची उंची साधारण ट्रक असलेल्या उंचीनुसार करण्यात आली.

त्यामुळे या पुलाखालून ट्रक तर जाऊ लागल्या पण मशिनरी घेऊन जाणाऱ्या ट्रकला आता अडचणी येऊ लागल्या आहे. दरम्यान, ११ डिसेंबरला समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी असा मार्ग खुला करण्यात आला होती. पण सोमवारी लोकार्पणाच्या ठिकाणीच एक अपघात झाला होता. त्यानंतर आता पुन्हा ट्रक अडकल्याची बातमी समोर आली आहे.

महत्वाच्या बातम्या-
samruddhi mahamarg : मोदींनी समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले त्याच ठिकाणी पहील्याच दिवशी झाला भीषण अपघात
हार्दीक पांड्याची जागा घेण्यासाठी ‘हा’ मराठमोळा खेळाडू सज्ज; एकट्याच्या बळावर संघाला जिंकवतोय
पठाण चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी शाहरुख पोहोचला माँ वैष्णोदेवीच्या दरबारात, झाला नतमस्तक

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now