Samruddhi Mahamarg car accident | नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाले होते. पण त्यानंतर विचित्र घटना घडताना दिसून येत आहे गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघाताच्या घटना घडत आहे. आता गुरुवारी या मार्गावर तिसरा अपघात झाल्याचे समोर आले आहे.
शिर्डीहून अमरावतीकडे येणाऱ्या एका कारचा समृद्धी महामार्गावर अपघात झाला आहे. संबधित अपघात हा विझोरा शिवारात झाला आहे. या अपघातात पती, पत्नी आणि त्यांचा मुलगा जखमी झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला आहे.
संबंधित घटना ही गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात जखमी झालेल्यांची नावे सुमीत गावंडे, प्रियंका गावंडे अशी आहे. यामध्ये त्यांचा ११ महिन्यांचा मुलगा वेद सुद्धा जखमी झाला आहे. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तिघेही शिर्डीवरुन अमरावतीकडे निघाले होते. पण विझोरा शिवारात आल्यानंतर सुमित गावंडे यांचा अचानक गाडीवरचा ताबा सुटला आणि त्यांच्या गाडीचा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर लगेचच त्यांच्या कारमधील एअरबॅग उघडली. त्यामुळे जिवीतहानी टळली आहे.
या अपघातामुळे तिघांनाही दुखापत झाली आहे. अपघातानंतर महामार्गावरील रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पोहचली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गावंडे यांनी आपल्या जवळच्या नातेवाईकांना बोलावून लगेचच ते मेहरकडे गेले.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून रस्ते अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. त्यानंतर समृद्धी महामार्ग बनवल्यामुळे रस्ते अपघात कमी होतील तसेच प्रवासाठी लागणारा वेळही कमी होईल, असे म्हटले जात होते. पण रविवारी लोकार्पण होऊन आतापर्यंत तीन अपघात या मार्गावर झाल्याचे समोर आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
shivsena : शिंदेंना दणका! ‘या’ जिल्ह्यात शिंदे गटात गेलेले सगळेच्या सगळे शिवसैनिक पुन्हा ठाकरे गटात दाखल
sanjay raut : आता संजय राऊतांची जीभ घसरली; बाबासाहेब आंबेडकरांबाबत केले वादग्रस्त विधान; म्हणाले…
सिनेमाबाबत झालेले वाद दिपिकाला चांगलेच फळफळले; वादानंतर झाली तुफान कमाई