NCB ने शुक्रवारी बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझवर सापडलेल्या ड्रग्ज प्रकरणी क्लीन चिट दिली. या प्रकरणी केवळ 14 जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, पुराव्याअभावी आर्यनसह 6 जणांची सुटका करण्यात आली आहे.
आर्यन खानने अमली पदार्थ बाळगल्याचा वा त्याचं सेवन केल्याचा कोणाताही पुरावा नसल्याचं ‘एनसीबी’ने स्पष्ट केलं आहे. त्यानंतर आर्यन खान प्रकरणाचे तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर केंद्र सरकारने कठोर कारवाई करण्यास सांगितले. बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी समीर वानखेडे यांची चौकशी सुरू असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
या प्रकरणामुळे सध्या समीर वानखेडे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. अशातच समीर वानखेडे यांचं एक नवीन ट्वीट चर्चेत आलं आहे. वानखेडे यांनी आपल्या ट्विटमधून नकारात्मक गोष्टींकडे फारसं लक्ष देत नसल्याचं म्हटलं आहे. त्यांच हे ट्विट प्रचंड मोठ्या प्रमाणत व्हायरल झालं आहे.
वाचा काय आहे ट्विट..? वानखेडे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘मी नकारात्मक गोष्टींकडे फारसं लक्ष देत नाही. असं केल्याने तुम्ही प्रगतीच्या दिशेनं पुढे जाऊ शकत नाही. नेहमी सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रीत करायला हवं. यामुळे आपलं आपल्या निवडींवर जसं नियंत्रण असतं, तसं आपणही नियंत्रणात राहतो,’ असं सूचक ट्विट त्यांनी केलं आहे.
https://twitter.com/swankhede_IRS/status/1531085485036015618?s=20&t=dUeYMNSh6GowIX0-gWib1w
वाचा का अडचणीत आले समीर वानखेडे..? एनसीबी मुंबई विभागाचे तत्कालीन संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने मुंबईतील कार्डिलिया क्रूझ ड्रग्ज पार्टीदरम्यान छापेमारी केली होती. गेल्या वर्षी 2 आणि 3 ऑक्टोबरच्या मध्यरात्री या क्रूझवर ड्रग्ज पार्टी सुरू होती.
त्यावेळी एनसीबीने आर्यन खानसह अनेकांना ताब्यात घेतले होते. अंमली पदार्थ बाळगल्याच्या आरोपांखाली त्यांना अटक झाली होती. या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्याची कोर्टाने दिलेली मुदत संपल्यानंतर काल, शुक्रवारी एनसीबीने दोषारोपपत्र दाखल केले.
त्यात आर्यन खान याच्यासह सहा जणांना क्लिनचिट देण्यात आली आहे. त्यामुळे एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आता एकीकडे आर्यन खानला दिलासा मिळाला आहे, मात्र दुसरीकडे समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण आता आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी योग्य तपास न केल्याने समीर वानखेडेवर कठोर कारवाईचे आदेश गृह मंत्रालयाने जारी केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
शिवसेनेला शह देण्यासाठी भाजप मैदानात, ‘या’ बड्या नेत्याला दिली राज्यसभेची उमेदवारी, चर्चांना उधाण
ठाकरे सरकारमध्ये काँग्रेसला दुय्यम वागणूक; काँग्रेस हायकमांड आज घेणार मोठा निर्णय
पांड्याची हवा! गुजरात टायटन्सने पदार्पणातच कमावले कोट्यवधी, पहा कोणाला कोणतं बक्षीस मिळालं
लग्नाच्या 30 वर्षांनंतर दोघांतील नात्यावर बोलली अर्चना पूरणसिंह; म्हणाली, वयातील फरकामुळे…