Share

शिवसेनेने डावलल्यानंतरही संभाजीराजे राज्यसभेत जाणार, मतांचे गणितही जुळवले; जाणून घ्या…

sambhaji raje

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी सुरू असलेल्या चर्चाना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. शिवसेनेने राज्यसभेच्या जागेसाठी कोल्हापूरचे शिवसेना नेते संजय पवार यांची घोषणा केली आहे. याबाबत अधिकृत घोषणा झालेली नसली तरी लवकरच ती घोषणा करण्यात येणार आहे. या जागेवर शिवसेना संभाजीराजे यांना पाठवेल अशी चर्चा होती.

संभाजीराजेंना डावलून शिवसेनेने संजय पवारांना ही राज्यसभेची उमेदवारी दिली आहे, असे म्हटले जात आहे. सहाव्या जागेसाठी खासदार संभाजी राजे भोसले प्रयत्नरत आहेत. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसने संभाजी राजे यांना पाठिंबा दिला आहे.

मात्र खासदार संजय राऊत यांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे आता संभाजीराजेंना शिवसेनेने डावल्यानंतर राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. मराठा क्रांती मोर्चा व छावा संघटना आक्रमक झाल्या आहे. ‘संजय राऊत यांचा सत्तेचा माज महाराष्ट्रातील शिव प्रेमी जनता उतरवेल,’ असा इशारा छावा संघटनेने दिला आहे.

माध्यमांशी बोलताना मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र समन्वयक अंकुश कदम यांनी थेट शिवसेनेला इशारा दिला आहे. ‘एवढी वर्षे ज्या छत्रपतींच्या नावावरती राजकारण करत आहात सत्ता भोगत आहात. या शिवसेनेचा शिव आमच्या छत्रपतींचा आहे, अशी जहरी टीका कदम यांनी केली.

याचबरोबर ‘आम्ही 2 दिवस वाट बघू आणि थेट वर्षा, अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्या घरी चाल करून जाणार आहोत. या 3 ही नेत्यांच्या घरी चाल करून, शिवाजी महाराजांच्या पोवाडा गाणार आहोत,’ असा इशारा छावा संघटनेने दिला आहे. ‘शिवसेनेचा संभाजी राजे यांना शिवबंधन बांधायचा कट आहे,’ असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान, मराठा क्रांती मोर्च्याच्या करण गायकर यांनी थेट शिवसेनेला गर्भित इशारा दिला आहे. ‘निवडणुकीत शिवसेनेला जागा दाखवून देऊ,’ असं त्यांनी म्हंटलं आहे. ते म्हणाले, ‘संभाजीराजेंना विजयासाठी लागणाऱ्या 42 मतांची जुळवाजुळव झाली आहे. 5 ते 6 मतांची कमी असल्याने जुळवाजुळव चालू असल्याची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.

महत्त्वाच्या बातम्या
तारकर्लीतील समुद्रात बोट बुडून झालेल्या अपघातात शिवसेना आमदाराच्या पुतण्याचा मृत्यू
“जेव्हा जेव्हा छत्रपतींना सन्मान देण्याची वेळ आली, तेव्हा तेव्हा शिवसेनेने त्यांचा अपमानच केलाय”
‘आम्हाला तुमची आवश्यकता’; राष्ट्रवादीचे पंकजा मुंडेंना पक्षप्रवेशासाठी जाहीर निमंत्रण
Scam 2003: ‘या’ अभिनेत्याला मिळाली २० हजार कोटींच्या घोटाळ्याची मास्टरमाइंड बनण्याची संधी

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now