सध्या राजकीय वर्तुळात राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी चर्चा सुरू आहे. ‘उद्या दुपारी १२ वाजता शिवबंधन बांधण्यासाठी मातोश्रीवर या,’ असा निरोप राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेना खासदार संजय राऊतांकडे छत्रपती संभाजीराजेंना देण्यासाठी निरोप पाठवल्याची बातमी आता समोर येत आहे.
यामुळे आता संभाजीराजें उद्या (सोमवार) शिवबंधन बांधणार का? याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागले आहे. अशातच एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिल्याची माहिती सध्या मिळत आहेत. यामुळे आता शिवसेनेच्या पुढच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
याचबरोबर महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून संधी देण्याची संभाजीराजे यांच्याकडून मागणी झाल्याची माहिती आहे. यामुळे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे त्याच सोबत राज्याचे लक्ष आता महाविकास आघाडी सरकारकडे याचबरोबर उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लागलं आहे.
तसेच शिवसेनेची ही ऑफर नाकारल्यानंतर संभाजीराजे छत्रपती मराठा मोर्चाच्या सर्व समन्वयकांशी चर्चा करणार असल्याची देखील माहिती आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेचं शिष्टमंडळ तासाभरापूर्वीच संभाजीराजेंच्या भेटीला हॉटेल ट्रायडंट येथे गेलं होतं. सुमारे पाऊण तास संभाजीराजेंशी सखोल चर्चा केली.
याच दरम्यान शिवसेना नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा निरोप संभाजीराजेंना दिला असल्याची माहिती मिळत आहे. ‘संभाजीराजेंनी सेनेत पक्षप्रवेश करावा,’ असा निरोप मुख्यमंत्र्यांनी राऊतांकरवी संभाजीराजेंना दिला आहे. याचा अर्थ शिवबंधन बांधले नाही तर शिवसेना पर्यायाचा विचार करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही शिवबंधनाची अट असल्याचे संभाजीराजेंना सांगितलं असल्याच समजत आहे. या फर्मानानुसार संभाजीराजेंनी सोमवारी दुपारी १२ वाजता शिवबंधन बांधावे, यावर ठाकरे ठाम राहिले आहे. यामुळे आता उद्याचा दिवस भर महत्त्वाचा ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
‘हे होणारच होतं… पवार साहेब आणि शब्द पाळला होऊच शकत नाही,’ राणे स्पष्टच बोलले
‘शिवबंधन बांधण्यासाठी मातोश्रीवर या,’ संभाजीराजे छत्रपतींना उद्धव ठाकरेंनी धाडला निरोप, पक्षप्रवेश निश्चित?
अयोध्येत विरोध हा भाजपचाच ट्रॅप? पुण्यातल्या सभेत राज ठाकरेंनी योगींना बनवलं टार्गेट, तर फडणवीस…
ठाकरे सरकारनं करून दाखवलं! पेट्रोल, डिझेल आता आणखी स्वस्त; जाणून घ्या नवे दर