राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. अपक्ष म्हणून उभे राहिलेले माजी खासदार संभाजीराजे छत्रपती हे राज्यसभेच्या रिंगणातून माघार घेणार असल्याच बोललं जातं आहे. विशेष बाब म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्यास आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत.
अशातच उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच संभाजीराजेंवर माघार घेण्याची नामुष्की ओढावली असल्याच पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, याबद्दल खुद्द संभाजीराजे उद्या (शुक्रवारी) पत्रकार परिषद घेवून अधिकृत घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. समजा कोणत्याच पक्षाने पाठबळ दिले नाही तर संभाजीराजे यांच्यापुढे या लढतीतून माघार घेण्याशिवाय अन्य कोणताच पर्याय नाही. कारण उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दहा आमदार सूचक म्हणून लागतात. मात्र संभाजीराजे यांना पक्षीय पाठबळ नसेल, तर हे आमदार आणणार कोठून, हा प्रश्न आहे.
महाविकास आघाडीत आठ, तर विरोधात भाजपकडे पाच अपक्ष आमदार आहेत. यामुळे आता संभाजी राजे पुरते अडचणीत सापडले आहेत. अजूनही संभाजी राजे यांच्या पुढे 2 पर्याय आहेत. एकतर शिवसेनेचा पर्याय स्वीकारणे, आणि दूसरा महनेज लढतीतून बाजूला होणे हेच दोनच पर्याय आजच्या घडीला त्यांच्यापुढे आहेत.
दरम्यान, यामुळे आता संभाजीराजे नेमका कोणता निर्णय घेणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने संभाजी राजे यांना शिवबंधन बांधण्याची अट घातली होती. मात्र त्यांनी ती मान्य न केल्याने संभाजीराजेंना डावलून शिवसेनेने संजय पवारांना ही राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.
अशातच आज संभाजी राजे यांनी केलेली फेसबुक पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे. संभाजीराजेंनी केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णकृती पुतळ्यासमोर नतमस्तक होताना दिसत आहेत. “महाराज… तुमच्या नजरेतलं स्वराज्य मला घडवायचंय… मी कटीबद्ध असेन तो तुमच्या विचारांशी… मी बांधील असेन तो फक्त जनतेशी…”, असं या पोस्टमधून संभाजीराजेंनी म्हटलंय.
महत्त्वाच्या बातम्या
कोणी केला संभाजीराजेंचा गेम? राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेतल्याशिवाय उरला नाही दूसरा पर्याय
VIDEO: विराट प्रायवेट पार्टवर लावत होता एब्डोमिनल गार्ड, कॅमेरामॅनने शुट करून टाकली पुर्ण फिल्म
‘मला तुमची आठवण येते बाबा, तुम्हाला घट्ट मिठी मारायचीये’; विलासरावांच्या आठवणीने रितेशला अश्रु अनावर
IPL स्पर्धेतून बाहेर पडताच सुट्टी सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा, पत्नीसोबतचे रोमॅंटिक फोटो व्हायरल