Shivsena : एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर शिवसेनेने नुकताच एक मोठा निर्णय घेतला. शिवसेनेने संभाजी ब्रिगेडसोबत हातमिळवणी केली आहे. तसेच इथून पुढील निवडणूका दोन्ही पक्ष सोबत लढवणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दोन्ही पक्षांनी मिळून ही घोषणा केली.
मात्र, शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीनंतर राजकीय वर्तुळात अनेकांकडून प्रतिक्रिया येत आहेत. यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी या युतीवर टीका केली. यावर संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
“२०१९ मध्ये संभाजी ब्रिगेडने ४० जागांवर निवडणूक लढवली होती, परंतु त्यांना खूप कमी मतं मिळाली होती. महाराष्ट्रातील कोणताही पक्ष त्यांच्याशी युती करायला तयार नाही. संभाजी ब्रिगेडसोबत जाऊन काही होणार नाही,” अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती.
“शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड युतीमुळे भाजपची झोप उडाली आहे. चंद्रशेखर बावनकुळे तुमचा पोटशूळ का उठला आहे? संभाजी ब्रिगेडची एवढी भीती का वाटते? लक्षात ठेवा झंडू बाम घेऊन ठेवा, कारण तुमची अजून झोप उडवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा संतोष शिंदे यांनी दिला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, “आम्ही पहिल्यांदा निवडणूक लढवली. त्यामुळे किती टक्के मतदान पडले, किती डिपॉझिट जप्त झाले, असे भाजपा विचारत आहे. पहिल्याच निवडणुकीत बहुमताची अपेक्षा कशी काय करता? भाजपला महाराष्ट्रात सत्तेत यायला किती वर्षे लागली? असेही संतोष शिंदे म्हणाले आहेत.
तसेच तुम्हाला संभाजी ब्रिगेडची दहशत का वाटते? असा सवालही संतोष शिंदे यांनी यावेळी केला. सत्तेत आहात म्हणून सत्तेची मस्ती दाखवू नका, असे संतोष शिंदे गिरीश महाजन यांना म्हणाले. तसेच आम्ही नवीन आहोत म्हणजे गाफील आहोत असे समजू नका, असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
Marathi actress : पहिल्यांदा ताजमध्ये गेली अन् चहाची किंमत ऐकून हादरली; मराठी अभिनेत्रीने स्वतःच सांगीतला किस्सा
Bilquis Bano case : बिल्कीस प्रकरणातील आरोपींचे कारागृहातून सुटल्यानंतरचे वर्तन अत्यंत घृणास्पद; न्यायमुर्ती भडकले
दारू पिऊन महिलेचा बसमध्ये धिंगाणा; पोलिसांनाही आवरेना, व्हिडीओ व्हायरल
शिवसेनेतील दोन आमदार शिंदे गटाच्या गळाला; ‘या’ मंत्र्याच्या दाव्याने मोठी खळबळ