Share

raigad fort : ‘किल्ले रायगडावर पिंडदान होताना आम्ही रोखलं, पोलिसांनी दिली उडवाउडवीची उत्तरं’, संभाजी ब्रिगेडचा दावा

raigad

raigad fort : महाराष्ट्राचे वैभव अन् संपूर्ण जगाला शिवाजी महाराजांच्या पराक्रमी इतिहासाची आठवण करून देणारा किल्ले रायगड. याच रायगडावर एक अत्यंत निंदनीय घटना घडल्याची बाब समोर येत आहे. इतिहासाचा जागर करण्यासाठी, नव्याने इतिहास जाणून घेण्यासाठी लोक गडकिल्ल्यांवर जातात, हे सहाजिक आहे. मात्र वेगळाच प्रकार रायगडावर शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ घडल्याचे समोर आले.

शिवाजी महाराजांच्या समाधी जवळील धर्मशाळेच्या वास्तुत काही लोक पिंडदानाचा विधी करत असल्याचे आम्हास आढळून आले. त्यांना आम्ही लगेच रोखले, असा दावा संभाजी ब्रिगेड संघटनेकडून करण्यात आला आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. तसेच मराठा सेवा संघ रायगडचे चांदिवडे हे देखील उपस्थित होते. ब्रिगेडचे कोकण विभाग प्रमुख सूर्यकांत भोसले यांनी या घटनेचा आम्ही निषेध करतो, अशी प्रतिक्रिया दिली.

शिवाजी महाराजांच्या पवित्र समाधीजवळ असले घाणेरडे प्रकार आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे. तसेच या घटनेबाबत पोलिसांना विचारले असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली, असेही संभाजी ब्रिगेडकडून सांगण्यात आले.

याविषयी व्हायरल झालेल्या व्हिडिओत काही व्यक्ती समाधीच्या कोपऱ्याला पिंडदानासारखा विधी करताना दिसत आहेत. व शिवभक्त येऊन त्यांचे हे पिंडदान रोखतात, असे चित्र दिसते. याबाबत तमाम शिवभक्तांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

रायगडावर पर्यटनासाठी, ट्रेकिंगसाठी मोठ्या प्रमाणात तरुणाईची झुंबड उडालेली पाहायला मिळते. मात्र काही व्यक्ती चर्चेत येण्यासाठी की काय, अशा प्रकारची कृत्य करत करताना आढळून येतात. ज्या कृत्याबाबत सगळीकडून विरोध होण्याची शक्यता असते.

काही दिवसांपूर्वी रायगडावर काही व्यक्ती समाधी जवळ पुस्तक पूजा करत असल्याचे पोलिसांना आढळून आले. ते व्यक्ती कसली तर राखसोबत घेऊन पुस्तकाची पूजा करत होते. त्यांना पोलिसांनी अटक केली. २०१४ ला फडणवीस सरकार असताना रायगडावर लग्नविधी करण्यास परवानगी देण्याबाबत मोठ्या चर्चा रंगल्या होत्या. अशा प्रकारे अनेक वादाच्या घटना यापूर्वीही रायगडाबाबत घडल्याचे दिसून येते.

महत्वाच्या बातम्या-
ajit pawar : ‘मी आईला भेटायला जातो पण कधी फोटो काढत नाही’, बारामतीतून अजितदादांची मोदींवर टोलेबाजी
shivsena : ‘सरकारमध्ये असताना आम्ही षंढ झालो, म्हणून…’, सुहास कांदेंचं खळबळजनक विधान
Congress party : अखेर ठरलं! ‘या’ दोन तुल्यबळ नेत्यांमध्ये होणार काॅंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक, गांधी कुटुंब कुणाच्या बाजूने?

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now