शिवप्रतिष्ठान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे (sambhaji bhide) हे त्यांच्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत येत असतात. तसेच ते अनेकदा वादग्रस्त वक्तव्य करत असतात. आता संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा मोठं वक्तव्य केले आहे, ज्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.
काल सांगलीतील मिरजमध्ये शहरातल्या शिवाजी चौक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक आणि पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमात शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी भिडे यांची देखील उपस्थिती होती. यावेळी बोलताना त्यांनी अनेक मुद्यांवर सविस्तर भाष्य केलं.
‘एक म्लेंच्छ बाधा, दुसरी अंग्लो बाधा आणि आणि तिसरी गांधी बाधा.. अशा आपल्या देशाला तीन बाधा झाल्या आहेत. असे यावेळी बोलताना संभाजी भिडे म्हणाले. यावेळी बोलताना संभाजी भिडे गुरुजी यांनी देशातील जनतेचे रक्त गट बदलण्याचे मोठं विधान केले आहे. यामुळे संभाजी भिडे पुन्हा चर्चेत आले आहेत.
वाचा सविस्तर काय म्हणाले संभाजी भिडे.. ‘देश उभारण्याची ताकत मिळायची असेल, तर तर हिंदुस्थानाच्या १२३ कोटी लोकांचा रक्तगट हा छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा केला पाहिजे’, असे खळबळजनक विधान सभाजी भिडे यांनी केले आहे.
याचबरोबर देशाला म्लेंच्छ,अँग्लो आणि गांधीबाधा झाली असल्याच देखील त्यांनी म्हंटले आहे. दरम्यान, या तिन्ही बाधांवरील जर तोडगा कोणता असेल तर तो म्हणजे शिवछत्रपती आणि संभाजी महाराज. त्यांची त्याची उपासना आपण केली पाहिजे, असं स्पष्ट मत संभाजी भिडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं.
दरम्यान, पुढे बोलताना भिडे म्हणाले ‘देश उभारण्याची ताकत मिळायची असेल, तर तर हिंदुस्थानाच्या १२३ कोटी लोकांचा रक्तगट हा छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा केला पाहिजे.’ छत्रपती शिवाजी महाराजांनी देशासाठी त्याग केला पण कण सुद्धा तुम्ही जाणत नाही. ते जाणले असते तर देशाचे चित्र वेगळे असते असे देखील भिडे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
लेकाला वाचवण्यासाठी मारली उडी अन् पोराने मारली मिठ्ठी; अन् झालं होत्याच नव्हतं, वाचा सविस्तर
नवनीत राणांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे उघड, तरी त्यांना का वाचवलं जातय? आता भाजप गप्प का?
VIDEO: नेहा कक्करने पुष्पाच्या गाण्यावर केला भन्नाट डान्स, हॉट बिचवर दिसल्या हॉट अदा
शेवटच्या बाॅलवर षटकार मारताच चिडला हर्षल पटेल; मैदानावरच रियान परागच्या अंगावर धावून गेला