शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे हे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते वादात अडकण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे, त्यावर आता त्यांनी एक वक्तव्य केलं आहे.
अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्याचा बेशरमपणा करु नका, असे संभाजी भिडे यांनी म्हटले आहे. जुन्नर येथे शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांच्या मोहिमेची सांगता सभा होती. त्या सभेत बोलताना संभाजी भिडे यांनी हे वक्तव्य केलं आहे.
अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. पण हा बेशरमपणा करु नये. जगाचा बाप हा हिंदुस्थान असून याचे उत्तर सारे देश देतील, असे संभाजी भिडे यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही हिंदु पंचांगाच्या तिथीनुसार साजरी झाली पाहिजे, असेही संभाजी भिडे यांनी म्हटले आहे.
जुन्नर येथे शिवप्रतिष्ठानच्या धारकांच्या गटकोट मोहिमेच्या सांगता सभेत ते बोलत होते. त्यावेळी त्यांचे अश्रू सुद्धा अनावर झाले होते. शिवाजी महाराजांचा इतिहास जनसामान्यांपर्यंत पोहचण्यासाठी ही मोहिम सुरु करण्यात आली आहे.
या मोहिमेसाठी शिवप्रतिष्ठानचे ५० हजार धारकऱ्यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर ते किल्ले शिवनेरी असा २५ किलोमीटरचा डोंगरकड्यावरुन पायी प्रवास केला. त्यानंतर भाजपच्या दोन आमदारांसह आणि संभाजी भिडेंसोबत किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी हा कार्यक्रम पार पडला.
या मोहिमेची जुन्नरमधून सुरुवात झाली होती. त्यानंतर या शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांच्या या मोहिमेत भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि आमदार महेश लांडगे हे सहभागी झाले. त्यामुळे या मोहिमेची राजकीय वर्तुळातही चर्चा होऊ लागली होती.
महत्वाच्या बातम्या-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमुळे राष्ट्रवादीत उभी फुट; अजित पवारांसह बड्या नेत्यांची तातडीने धावाधाव
महिलांना घरबसल्या मिळणार १५ हजार रुपये, मोदी सरकारने आणली भन्नाट योजना; जाणून घ्या डिटेल्स
अदानीच नाही तर ‘या’ १६ कंपन्यांची हिंडनबर्गने लावली वाट, रिपोर्टमधून ‘असे’ कमवतात करोडो रुपये