sambhaji bhide : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असतात. अनेकदा त्यांनी केलेली विधान वादाच्या भोवऱ्यात देखील सापडली आहेत. आतापर्यंत अनेकदा भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील झाली होती.
अशातच आता पुन्हा एकदा भिडे यांनी एक खळबळजनक वक्तव्य केल असून ते वादाच्या भोवऱ्यात सापडणार असल्याच बोलल जातं आहे. आज भिडे गुरुजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले होते. मंत्रालयात संभाजी भिडे यांनी शिंदे यांची भेट घेतली.
मुख्यमंत्री झाल्यापासून मी त्यांची भेट घेतली नव्हती. त्यामुळे ही सदिच्छा भेट देण्यासाठी आलो आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी माध्यमांना दिली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना भिडे हे एका महिला पत्रकारावर चांगलेच भडकले. सध्या भिडे यांचे हे वक्तव्य चांगलच चर्चेत आले आहे.
महिला पत्रकारने विचारलेल्या प्रश्नावर बोलताना त्यांनी ”तू आधी कुंकू लाव, मग मी तुझ्याशी बोलतो” असे वादग्रस्त विधान केले आहे. ‘आमची भावना आहे की, स्त्री भारतमातेचं रुप आहे. भारत माता विधवा नाही. त्यामुळे कुंकू लाव मग तुझ्याशी बोलतो, असं मत संभाजी भिडे गुरूजींनी मांडले.
दरम्यान, आता भिडे यांच्यावर राज्यभरातून चांगलीच टीका होत आहे. भिडे यांच्यावर राजकीय वर्तुळातून देखील टीका करण्यात आली आहे. भिडे यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना काँग्रेसच्या महिला नेत्या यशोमती ठाकूर म्हणाल्या, ‘सदर बाब आश्चर्य वाटण्यासारखी आहे.
‘जी लोक मनुवादी आहेत. जे महिलांचा सन्मान करत नाहीत. त्यांनी नेहमी अंधश्रद्धा समोर आणलेली आहे. ‘आंबे खाऊन पुत्र प्राप्ती होईल’, असा प्रचार-प्रचार करणारे मंडळी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव समोर करतात. सातत्याने वादग्रस्त विधान करत असतात. छत्रपती, असं ठाकूर म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या-
दिराच्या प्रेमात वेडी झाली वहिणी, रात्री नवऱ्याला समोसा खाऊ घातला अन् त्यानंतर…
Maruti suzuki : मारूतीच्या ‘या’ CNG कारचा बाजारात धुमाकूळ; एकाच महीन्यात विकल्या दिड लाखांहून अधिक गाड्या
bachchu Kadu : दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही बच्चू कडूंनी रवी राणांना दिला इशारा; म्हणाले, यापुढे वाट्याला गेला तर…