मनोरंजन क्षेत्रात अफेअर बातम्या काही नवीन नाहीत. या क्षेत्रात अनेक अनेक नाती जोडली देखील आहेत आणि तुटली देखील आहेत. या क्षेत्रात कलाकारांमध्ये प्रेम निर्माण झाले. काहींचे प्रेमाचे रूपांतरण लग्नात झालेत, तर काहींचे ब्रेकअप झाले. याच्या पुढे जाऊनही अनेकांचे लग्नानंतर ही नाते तुटले आहे. बॉलिवूडसह साऊथ चित्रपटसृष्टीत ही अशा घटना पाहायला मिळाल्या आहेत.
साऊथची प्रसिद्ध जोडी म्हणून सामंथा रूथ प्रभू आणि नागा चैतन्य यांना ओळखले जाते. ही जोडी चाहत्यांना खूप आवडायची. या दोघांनी लग्न देखील केले होते. मात्र काही कारणामुळे यांचे नाते फार काळ टिकला नाही. मागील वर्षीच या दोघांनी घटस्फोट घेतला आहे. तेव्हा हे दोघेही नेहमी चर्चेत आहेत. यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगळे होण्याची घोषणा केली होती.
नागा आणि सामंथा वेगळे झाल्याची बातमी ऐकून चाहत्यांना देखील धक्का बसला होता. त्याचबरोबर नुकतेच सामंथाने नागा चैतन्यला सोशल मीडियावर अनफॉलो केले होते. मात्र आता दोघे एकत्र येण्याची चाहत्यांची अपेक्षा संपली आहे. यामागचे कारण म्हणजे सामंथाची पोस्ट आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या व्हायरल होत आहे.
त्याचबरोबर सामंथाने या अगोदरच तिच्या प्रोफाईलमधून नागासोबतचे सर्व फोटो हटवले होते. इतकेच नव्हे तर, तिने नागाला अनफॉलो देखील केले आहे. पण तरीही तो तिला फॉलो करतो आहे. सध्या सामंथाने नागाला अनफॉलो केल्यानंतर एक गूढ पोस्ट शेअर केली आहे.
सामंथाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये तिने लिहिले की, ‘कधी कधी ताकद ही तुमच्या आत इतकी मोठी आग नसते की प्रत्येकजण ती पाहू शकेल.. कधी कधी ती एक छोटीशी ठिणगी असते जी अगदी शांतपणे म्हणते की, पुढे जा, तुम्हाला मिळेल.’ जरी सामंथाने नागा चैतन्यला इंस्टाग्राम अनफॉलो केले आहे. मात्र ती अजूनही नागा चैतन्यचा भाऊ अखिल अक्किनेनीला फॉलो करते.
तसेच काही दिवसांपूर्वीच अशी बातमी समोर आली होती की, सामंथाने तिची लग्नाची साडी नागा चैतन्य आणि त्याच्या कुटुंबाला परत केली आहे. इतकेच नव्हे तर दोघं एकत्र येऊ शकतात अशा बातम्याही आल्या होत्या. पण नंतर सामंथाने याबाबत बोलताना सांगितले की, ही अफवा आहे.
तसेच सामंथाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती सध्या तिच्या आगामी ‘यशोदा’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याच्या व्यतिरिक्त तिच्याकडे सध्या बरेच प्रोजेक्ट्स आहेत. त्याचबरोबर नागा चैतन्यबाबत बोलायचे झाले तर, तो आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.