Share

माजी पती नागचैतन्याचे तीन टॅटू शरीरावर गोंदवल्याने समंथाला होतोय पश्चाताप? म्हणाली, कधीच..

Samantha

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रूथ प्रभू (Samantha) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. याद्वारे ती अनेक पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. नुकतीच समंथा इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी एनिथिंग’ हे लाईव्ह सेशन घेतली. यावेळी तिने चाहत्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची मोकळेपणाने उत्तरे दिली. तर यादरम्यान समंथाला एका चाहत्याने टॅटूबाबत विचारले असता तिने टॅटू कधीच न काढून घेण्याचा सल्ला दिला आहे.

समंथाला लाईव्ह सेशनदरम्यान एका चाहत्याने विचारले की, ‘टॅटूबाबत तुझ्या डोक्यात काही कल्पना आहेत का ज्या तुला भविष्यात काढायला आवडतील. या प्रश्नाचे उत्तर देताना समंथाने म्हटले की, एक गोष्ट मी स्वतःला सांगू इच्छिते की, कधीच टॅटू काढू नकोस. अजिबात कधीच टॅटू काढू नकोस’.

समंथाच्या या उत्तराने तिच्या चाहत्यांसोबत सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. कारण समंथाने स्वतः तिच्या शरीरावर वेगवेगळे तीन टॅटू गोंदवून घेतले आहेत. या टॅटूंचा संबंध तिचा माजी पती नागचैतन्याशी संबंधित आहेत. समंथाने तिच्या पाठीवर YMC असा एक टॅटू काढून घेतला. YMC याचा अर्थ ‘ये माय चेसावे’ (Ye Maya Chesave).

समंथाने काढलेला हा टॅटू तिचा पती नागचैतन्यासोबतच्या तिच्या पहिल्या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाच्या सेटवरच दोघांची ओळख झाली होती आणि त्यांच्यात प्रेम झाले होते. समंथाने दुसरा एक टॅटू तिच्या रिब्सवर गोंदवला आहे. यामध्ये Chay असे लिहिलेले आहे. नागचैतन्याला अनेकजण ‘चै’ या नावाने ओळखतात. ‘चै’ हे त्याचं टोपणनाव आहे.

तर समंथाने तिसरा आणखी एक टॅटू तिच्या मनगटावर गोंदवला आहे. असाच टॅटू नागचैतन्याच्या हातावरही पाहायला मिळतो. परंतु, आता नागचैतन्यासोबत घटस्फोट झाल्याने समंथाला या टॅटूंचा पश्चात्ताप होत आहे. त्यामुळेच ती परत कधीच टॅटू काढून घेऊ नकोस, असे सांगत असल्याची चर्चा सध्या सुरु झाली आहे.

दरम्यान, समंथा आणि नागचैतन्या २०१७ साली विवाहबंधनात अडकले होते. परंतु, लग्नाच्या चार वर्षाच्या सुखी संसारानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. २ ऑक्टोबर २०२१ रोजी दोघांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दोघे घटस्फोट घेत असल्याचे जाहिर केले.

समंथाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास लवकरच ती ‘शकुंतलम’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी ‘शकुंतलम’ या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले होते. यामध्ये समंथा एका राणीच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय समंथा ‘यशोदा’ या चित्रपटातही दिसणार आहे. अद्याप या चित्रपटासंदर्भात कोणतेही पोस्टर समोर आले नाही.

महत्त्वाच्या बातम्या :
आर माधवनच्या मुलाचं होतंय कौतुक, विदेशात उंचावली भारताची मान; केली ‘ही’ कौतुकास्पद कामगिरी
मृत्यूच्या वेळी गर्भवती होती ‘ही’ अभिनेत्री; अमिताभ बच्चनसोबत ‘या’ चित्रपटात केलं होतं काम
रणबीर कपूरनंतर आता बहिण करिश्मा कपूरचं होणार लग्न? ‘या’ फोटोमुळे सुरु झाली चर्चा

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now