दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आपल्या कामासोबत वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमी माध्यमात चर्चेत असते. आताही समंथा तिच्या एका जाहिरातीमुळे चर्चेत आली आहे. नुकतीच समंथाने एका नवीन जाहिरातीचे चित्रीकरण केले. या जाहिरातीमध्ये समंथा फारच ग्लॅमरस अंदाजात दिसून येत आहे. तर तिला अशा अंदाजात पाहून चाहते थक्क झाले आहेत.
समंथाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर तिच्या नव्या जाहिरातीचा व्हिडिओ शेअर केला आहे. तिने एका वेबरेज कंपनीसाठी हे जाहिरात केलं असून यासंदर्भात व्हिडिओ शेअर करत तिने लिहिले की, ‘मी मरण्यास तयार आहे कारण मी MadeOfPride आहे. तुम्हीही तुमच्या मूव्हस दाखवा आणि डान्सच्या युद्धात सहभागी व्हा. जगाला दाखवा की तुम्ही कशाने बनलेले आहात आणि तुम्ही काय करू शकता?’
समंथाने शेअर केलेल्या व्हिडिओत ती वेगवेगळ्या आऊटफिटमध्ये दिसून येत आहे. सुरुवातीला ती पांढऱ्या रंगाच्या कॉर्सेट टॉप आणि पॅन्टमध्ये दिसत आहे. यावर तिने डायमंड कट हिअररिंग्स घातले आहेत. यानंतर तिने लाल रंगाचा ऑफ शोल्डर ब्रा आणि काळा लेदर पँट अशा आऊटफिटमध्ये दिसत आहे.
दोन्ही लूकसाठी तिने न्यूड मेकअप केला आहे. या दोन्ही लूकमध्ये समंथा खूपच हॉट दिसत असून तिच्या या लूकवर चाहते मात्र फिदा झाले आहेत. समंथाच्या या व्हिडिओवर चाहते लाईकचा वर्षाव करच कमेंटद्वारे तिचे भरभरून कौतुक करत आहेत.
दरम्यान, समंथाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास समंथा लवकरच ‘शकुंतलम’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये समंथा एका राणीच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतीच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले. याशिवाय समंथा ‘यशोदा’ या चित्रपटातही दिसणार आहे. अद्याप या चित्रपटासंदर्भात कोणतेही पोस्टर समोर आले नाही.
दुसरीकडे, बॉलिवूडमध्येही समंथा लवकरच पदार्पण करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘फॅमिली मॅन २’ या वेबसीरीजनंतर समंथाच्या लोकप्रियतेत भर पडली आहे. तसेच ‘पुष्पाः द राईज’ या चित्रपटातील ‘उ अंटावा’ या गाण्याद्वारेही समंथाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. दिवसेंदिवस तिच्या लोकप्रियतेत वाढ होत असून ती दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
हवा उतरली! भुबन बड्याकरने ‘त्या’ वक्तव्यावर मागितली माफी, म्हणाले, ‘गरज पडली तर पुन्हा शेंगदाणे विकेन’
VIDEO: अमिताभ यांना विचारला सेक्सी मुलींबद्दल ‘हा’ प्रश्न, अभिषेकने उत्तर देताच करणची बोलती झाली बंद
‘तुला कोणी हात लावला तर मला सांग’, माफियांपासून वाचवण्यासाठी ‘या’ अभिनेत्याने धरला होता शाहरूखचा हात