समांथाच्या(Samantha) चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. एका न्यूज पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, समंथाला गंभीर हेल्थ प्रॉब्लेमचा सामना करावा लागत आहे. समंथा रुथ प्रभू आता फक्त साउथची सुपरस्टार राहिली नाही, आता ही सुंदर अभिनेत्री संपूर्ण भारताची सुपरस्टार बनली आहे. फॅमिली मॅन 2 मधील तिची व्यक्तिरेखा लोकांना आवडली.(samantha-ruth-prabhu-got-serious-illness-stopped-shooting-and-went-abroad-for-treatment)
‘पुष्पा : द राइज’मध्ये(Pushpa The rise) तिच्यावर शूट केलेले गाणं आजही लोकांना आठवतं. सध्या समंथा अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. मात्र, हेल्थ प्रॉब्लेममुळे समांथाने शूटिंगमधून ब्रेक घेतला असून उपचारासाठी ती अमेरिकेत गेली आहे. समंथा स्किनशी संबंधित आजाराने त्रस्त असल्याचे बोलले जात आहे. या आजाराला ‘पॉलीमॉर्फ्स लाइट इरप्शन’ म्हणतात.
हा रोग सूर्यप्रकाशाच्या थेट संपर्कामुळे त्वचेवर होतो. यामुळे समंथा कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत नाही. नुकत्याच पार पडलेल्या अवॉर्ड फंक्शनच्या रेड कार्पेटपासूनही अभिनेत्रीने अंतर ठेवले. डॉक्टरांच्या सल्ल्याने या अभिनेत्रीने सध्या कामातून ब्रेक घेतला आहे. सध्या समंथा खुशी या चित्रपटाचे शूटिंग करत होती. मात्र, आता तिने शूटिंग थांबवले आहे. या चित्रपटात समंथासोबत विजय देवरकोंडा(Vijay Devar konda) दिसणार आहे. या शूटिंगचे शेड्युल आता पुढे ढकलण्यात आले आहे.
Polymorphs Light Eruption हा दुर्मिळ आजार आहे. सामंथाच्या आधी सलमान खान आणि इरफान खान देखील या आजाराचे बळी ठरले आहेत. सहसा ज्यांना सूर्यप्रकाशात चालण्याची सवय नसते, त्यांना सूर्याच्या थेट संपर्कात आल्यावर खाज सुटू लागते. या खाजमुळे त्वचेवर डाग येऊ लागतात. डागांसह, एखाद्या व्यक्तीला वेदना देखील होतात. सलमान खाननेही अमेरिकेत जाऊन आपल्या आजारावर उपचार केले.