Share

एकेकाळी शिक्षण घ्यायलाही नव्हते पैसे, आता आहे साऊथमधील महागडी अभिनेत्री; वाचा समंथाचा प्रवास

Samantha

अभिनेत्री समंथा रूथ प्रभू (Samantha) आज दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आपल्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये समंथाने अनेक हिट चित्रपटात काम केले. अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर समंथाने आज सिनेसृष्टीत आपली एक ओळख निर्माण केली आहे. परंतु, इथपर्यंत पोहोचण्यासाठी समंथाचा मार्ग काही सोपा नव्हता. यशाचे शिखर गाठण्यासाठी समंथाला खूप मेहनत करावी लागली होती. तर आज या लेखाद्वारे समंथाविषयी माहिती जाणून घेऊया.

समंथा रूथ मागील वर्षी पती नागचैतन्यासोबतच्या घटस्फोटामुळे फारच चर्चेत आली होती. नागचैतन्य हा दाक्षिणात्य अभिनेता नागार्जूनचा मुलगा आहे. दोघांनी मागील वर्षी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ते वेगळे होत असल्याची घोषणा केली होती. या दोघांच्या घटस्फोटामागे अनेक तर्कवितर्क लावण्यात आले. परंतु दोघांच्या घटस्फोटामागचे नेमके कारण समोर आले नाही.

https://www.instagram.com/p/ByNnmVKhRuP/

नागचैतन्यासोबतच्या घटस्फोटानंतर समंथाबाबत अशाही बातम्या समोर आल्या की, तिने पतीद्वारे देण्यात आलेली २०० कोटी रूपयांची पोटगीसुद्धा नाकारली. यामागेही अनेक कारणे सांगण्यात आली. परंतु, तुम्हाला माहित आहे का? स्वतः समंथाचे नेटवर्थसुद्धा काही कमी नाही. रिपोर्टनुसार, समंथा रूथ आज ८० कोटी रूपयांची मालकीन आहे. पण समंथाने तिच्या मेहनतीच्या जोरावर ही संपत्ती कमावली आहे.

आज कोट्याधीश असणाऱ्या समंथाचे बालपण खूप हलाखीत गेले. १२ वीपर्यंतचे शिक्षण घेण्यासाठीही तिच्या कुटुंबीयांकडे पुरेसे पैसे नव्हते. अशात कुटुंबीयांच्या मदतीसाठी समंथा पुढे सरसावली. कुटुंबीयांच्या कमाईत हातभार लावण्याच्या उद्देशाने ती मॉडेलिंगकडे वळाली. शिक्षण घेत असतानाच पार्टटाईम मॉडेलिंग करत तिने कुटुंबासाठी पैसे जमावण्यास सुरुवात केली.

मॉडेलिंग करत असतानाच समंथाला चित्रपटांचीही ऑफर मिळण्यास सुरुवात झाली. त्यानुसार ‘एम माया चेसावे’ या चित्रपटाद्वारे तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर ती मागे वळून पाहिली नाही. एकामागून एक हिट चित्रपटात काम करत तिने सिनेसृष्टीत आपली ओळख निर्माण केली. तर मागील वर्षी ‘फॅमिली मॅन २’ आणि ‘पुष्पा : द राईज’ या चित्रपटाद्वारे तिने यशाचे नवे शिखर गाठले.

‘फॅमिली मॅन २’ या वेबसीरीमधील तिच्या राझी या भूमिकेला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती. या सीरीजमुळे समंथाच्या लोकप्रियतेत भर पडली. तर ‘पुष्पाः द राईज’ या चित्रपटातील ‘उ अंटावा’ या गाण्याद्वारेही समंथाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. दिवसेंदिवस तिच्या लोकप्रियतेत वाढ होत असून ती दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे.

दरम्यान, समंथाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास समंथा लवकरच ‘शकुंतलम’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘शकुंतलम’ या चित्रपटाचे पोस्टरही काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आले. यामध्ये समंथा एका राणीच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय समंथा ‘यशोदा’ या चित्रपटातही दिसणार आहे. अद्याप या चित्रपटासंदर्भात कोणतेही पोस्टर समोर आले नाही.

महत्त्वाच्या बातम्या :
‘या’ गोबऱ्या गालांच्या चिमुकलीला ओळखलंत का? नवाजुद्दीन सिद्दिकीसोबत पहिल्यांदाच झळकणार चित्रपटात
गालावर किस करायचा होता टास्क अन् तिने थेट केला लिपलॉक; ‘लॉकअप’मधला किसिंगचा VIDEO झाला व्हायरल
अंजलीसोबत झाला धोका, ज्याला प्रपोज केलं तो निघाला एका मुलाचा बाप; कंगनाने केली पोलखोल

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now