साऊथ सुपरस्टार नागा चैतन्य(Naga Chaitanya) आणि समंथा हे त्यांच्या घटस्फोटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. आता हे दोघेही एकमेकांपासून वेगळे झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. (samantha-nagachaitanyas-relationship-doesnt-last-for-four-years-now-nagachaitanya)
समंथा(Samantha) सध्या तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत असताना, नागा पुन्हा एकदा एका अभिनेत्रीच्या प्रेमात क्लीन बोल्ड झाल्याच्या बातम्या येत आहेत. नागा पुन्हा एकदा आपल्या लव्ह लाईफला संधी देण्याच्या मूडमध्ये असून घटस्फोटाच्या काही महिन्यांनंतर त्याचा शोधही पूर्ण झाला आहे.
सध्या नागा चैतन्य अभिनेत्री शोभिता धुलीपालाला(Shobhita Dhulipala) डेट करत असल्याची माहिती आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता नुकताच शोभितासोबत त्याच्या नवीन घरात दिसला आहे. तेव्हापासून दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे.
नागाने हैदराबादच्या(Haidrabad) जुबली हिल्समध्ये नवीन घर घेतले आहे, सध्या तिथे काम सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या घरात दोघांनाही खूप कम्फर्टेबल पाहिले गेले. रिपोर्ट्सनुसार, नागा चैतन्य शोभिताला त्याचे आलिशान घर दाखवत होता.
यावेळी दोघेही खूप खुश दिसत होते. घराला भेट दिल्यानंतर नागा आणि शोभिताही कारमधून एकत्र जाताना दिसले. तेव्हापासून या दोघांच्या नात्याबाबत चर्चा सुरु आहे
मात्र, या वृत्तावर अद्याप नागा चैतन्य किंवा शोभिता यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. समंथा आणि नागा चैतन्य यांचा गोव्यात(Gova) 6 ऑक्टोबर 2017 रोजी विवाह झाला होता. 10 कोटींच्या या भव्य लग्नाची जगभरात चर्चा झाली पण हे लग्न फार काळ टिकू शकले नाही. चार वर्षांपेक्षा कमी काळ चाललेले हे लग्न घटस्फोटात संपले.