Share

samanth prabhu : गंभीर आजाराने त्रस्त समंथाची प्रकृती प्रचंड खालावली; उपचारासाठी तातडीने पाठवावे लागले ‘या’ देशात

samantha ruth prabhu

samanth prabhu going to south korea | समंथा रुथ प्रभू तिच्या आजारावरील चांगल्या उपचारासाठी दक्षिण कोरियाला जात असल्याचे वृत्त आहे. दक्षिण फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने नुकतीच ऑक्टोबरमध्ये सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये तिने मायोसिटिस नावाच्या आजाराशी आपण लढत असल्याचे सांगितले होते.

आपल्या आजाराची माहिती देत हॉस्पिटलचा फोटो तिने शेअर केला होता. समंथाने सांगितले होते की अलीकडेच तिला ऑटोइम्यून डिसीज मायोसिटिस झाल्यचे समोर आले आहे. जो बरा होण्यास थोडा वेळ लागू शकतो. आता अभिनेत्री तिच्या उपचारासाठी दक्षिण कोरियाला जाणार आहे.

असे सांगितले जात आहे की समंथा तिच्या अपेक्षेइतक्या वेगाने बरी होत नाहीये. असे सांगण्यात येत आहे की समंथाला आयुर्वेदिक औषधांवर उपचार हवे आहे. त्यामुळे आता ती दक्षिण कोरियाहून उपचार घेणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, समंथा रुथ प्रभू काही महिने दक्षिण कोरियामध्ये राहणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण कोरियामध्ये उपचारादरम्यान तिची तब्येत सुधारेपर्यंत ‘खुशी’ चित्रपटाच्या सेटवर परतण्याचा विचार समंथा करत आहे. या चित्रपटात विजय देवरकोंडा देखील असल्याचे सांगितले जात आहे. अशात तिची प्रकृती अचानक खालावल्याने तिने दक्षिण कोरियाला जाण्याचा निर्णय घेतला आहे.

मायोसिटिस हा एक ऑटोइम्यून डिसऑर्डर आहे. या आजारामुळे एकाचवेळी शरीरामध्ये वेगवेगळे बदल होत असतात. इतकंच नाहीतर शरीरात होणाऱ्या बदलांमुळे रुग्णाचे शरीर कमजोर होत जाते. धक्कादायक गोष्ट म्हणजे अजूनपर्यंत या आजारावर कोण ठोस उपचार नाहीये.

मायोसिटिसने पीडित रुग्णाच्या शरीराच्या आतून सूज येऊ लागते. असे म्हटले जाते की ही सूज सामान्यतः खांदे, हात, पाय, मांड्या, कंबर आणि पार्श्वभाग यांच्या स्नायूंमध्ये येते, परंतु जेव्हा अन्ननलिका, हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम होतो तेव्हा ती धोकादायक बनते.

महत्वाच्या बातम्या-
Raj Thackeray : ‘शिवरायांचं नाव घेतलं की मुस्लीम मतं जातील या भितीने शरद पवार शिवरायांचं नाव घेणं टाळतात’ – राज ठाकरे
ruturaj gaikwad : एका षटकात ७ षटकार ठोकण्यामागचं गुपित अखेर ऋतुराजने उलगडलं; म्हणाला, त्या व्यक्तीमुळे…
Dinesh Bana : इंडीयाला मिळाला माहीसारखा धडाकेबाज फिनिशर; किपींगही आहे धोनीसारखीच लाजवाब, आकडे पाहून हैराण व्हाल

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now