मॅन विथ गोल्डन हार्ट: सुनील ग्रोवरच्या तब्येतीची सलमान घेतोय काळजी, डॉक्टरांना दिला हा सल्ला

बॉलिवूडमधील अनेक कलाकार असे आहेत जे अनेक गरजू लोकांना मदत करतात. ज्यांनी अनेक लोकांना मदतीचा हात पुढे केला आहे. मागील दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे अनेकांवर आर्थिक संकट आले आहे. तेव्हा अनेक कलाकार हे पुढे आले होते. तर बॉलिवूडमध्ये असा एक कलाकार आहे. जो नेहमी अनेकांना मदत करतो. तो म्हणजे बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खान. मात्र सलमान खानने या वेळेस एका कलाकाराला मदत केली आहे.

खरंतर सलमानला ‘मॅन विथ गोल्डन हार्ट’ म्हटले जाते. तो मनाने किती चांगला आहे हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. अलीकडेच अभिनेता आणि कॉमेडियन सुनील ग्रोवरवर हृदयाची शस्त्रक्रिया झाली. त्यासंदर्भात सलमान खानने डॉक्टरांना वैयक्तिकरित्या ‘गुत्थि’ म्हणजेच सुनील ग्रोवरची काळजी घेण्यास सांगितले आहे.

सलमान खान आणि सुनील ग्रोवरने ‘भारत’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. याच दरम्यान या दोघांची खूप चांगली मैत्री देखील झाली. त्याचबरोबर असे ही म्हंटले जाते की, सलमान खानच्या जवळच्या व्यक्तींच्या यादीमध्ये सुनील ग्रोवरचेही नाव सामील आहे.

माध्यमांच्या वृत्तानुसार, सलमान खानने त्याच्या डॉक्टरांच्या टीमला सुनीलच्या तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सलमान सुनीलच्या खूप जवळ आहे. हॉस्पिटलमध्ये असताना सलमानने सुनीलच्या तब्येतीवर बारीक लक्ष ठेवले. सुनीलच्या तब्येतीची खात्री करण्यासाठी सलमानने बीइंग ह्युमनमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांच्या टीमलाही सांगितले. सलमानच्या टीमने सुनीलच्या हृदयाच्या शस्त्रक्रियेवरही लक्ष ठेवले. सध्या सुनीलला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

खरंतर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, सुनीलला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली होती. ब्लॉकेजमुळे सुनीलला हृदयविकाराचा झटका आल्याचे डॉक्टरांच्या टीमने सांगितले. सुनील ग्रोवरला ३ फेब्रुवारीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

सुनील ग्रोवरचा मित्र कपिल शर्मा देखील म्हणाला होता की, “सुनीलच्या तब्येतीबद्दल ऐकून मला आश्चर्य वाटले.”माध्यमांशी बोलताना कपिल शर्मा पुढे म्हणाला की, “जेव्हा मला हे समजले तेव्हा मला धक्का बसला. मला त्याच्या तब्येतीची खूप काळजी वाटत होती, मी त्याला लगेच मेसेज केला.” त्याचबरोबर सुनील ग्रोवरचे सर्व चाहतेही त्याच्या तब्येतीबद्दल खूप चिंतेत होते. चाहत्यांच्या प्रार्थनेने सुनील ग्रोवरला लवकर बरे केले आहे.

महत्वाच्या बातम्या
‘लतादीदींमुळे माझी बिर्याणी फेमस झाली, माझं अख्खं कुटुंब त्यावर जगलं’; वाचा भावूक करणारा किस्सा..
जॉन्सनच्या बेबी पावडरवर जगभरात येऊ शकते बंदी; यामागील कारण ऐकून बसेल धक्का…
घर मालकीणीने अनैतिक संबंधाला विरोध केल्यामुळे, 30 वर्षीय तरुणाने महिलेची केली निर्घृण हत्या…
..आणि राज ठाकरेंच्या खांद्यावर हात ठेवून नरेंद्र मोदी म्हणाले, ‘कसा आहेस राज?’