लवकरच बॉलिवूड किंग शाहरूख खानचा पठाण चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची चाहते आतूरतेने वाट बघताना दिसत आहेत. अशातच या चित्रपटाचे काही सीन्स अभिनेता सलमान खानने बघितल्याची माहिती समोर आली आहे. सलमान खानने पठाण चित्रपटाचे काही सीन्स पाहिल्यानंतर त्याने शाहरूख खानला फोन करुन चित्रपटाविषयी प्रतिक्रिया दिली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, सलमान खानने पठाण चित्रपटाचे २० मिनीटचे सीन्स पाहिले आहेत. हे सीन्स पाहताच सलमानने शाहरूखला फोन करुन चित्रपटाचे कौतुक केले आहे. या दोघांमध्ये बराच काळ चर्चा सुरु असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मुख्य म्हणजे, हा चित्रपट चांगलाच हिट होईल अशी प्रतिक्रिया सलमानने शाहरुखला दिली आहे.
याचबरोबर, सलमानने शाहरुखला चित्रपटाविषयी जास्त चिंता करण्याची गरज नसल्याचे सांगितले आहे. दरम्यान पठाण चित्रपटात शाहरुख खानसोबत जॉन अब्राहम आणि अभिनेत्री दिपीका पदुकोण दिसणार आहेत. या चित्रपटाचा टीझरही आऊट झाल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखीन वाढली आहे.
पठाण चित्रपटाला अली अब्बास जफर यांनी दिग्दर्शित केले आहे. या चित्रपटासाठी शाहरुख खानने ८५ कोटींचे मानधन घेतले आहे. तर इतर कलाकारांना ही २५ कोटींच्या पुढे मानधन देण्यात आले आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
या चित्रपटाला पुढील वर्षी प्रदर्शित करण्यात येणार आहे. तोपर्यंत चाहत्यांना चित्रपट पाहण्यासाठी वाट बघवावी लागणार आहे. बॉलिवूडमधील सर्वांत फेमस कलाकार या चित्रपटात झळकणार असल्यामुळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आता सलमान खानने देखील पठाण चित्रपटाचे कौतुक केले आहे. शाहरुख आणि सलमान खानचे आपसीवाद सगळीकडेच चर्चेत आहेत. त्यामुळे या दोघांनी एकमेकांविषयी काही प्रतिक्रिया दिली तर त्याला माध्यमांमध्ये लगेच उचलून धरण्यात येते. सांगण्यात येत आहे की, लवकरच हे दोघे एका कार्यक्रमात सोबत झळकणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
कश्मीरी पंडीतांच्या हत्याकांडावेळी भाजपचे ८५ खासदार काय करत होते? त्यांच्या पाठींब्यावर सरकार होते
गुजरात फाईल्सवर मी चित्रपट बनवायला तयार आहे पण.., दिग्दर्शकाचा थेट मोदींना सवाल
‘द काश्मीर फाईल्स’ चा बॉक्सऑफिसवर धुमाकूळ; आत्तापर्यंत केली ‘एवढ्या’ कोटींची कमाई
रोहित, विराटपेक्षाही श्रीमंत आहे ‘हा’ खेळाडू; एका आठवड्यात कमावतो तब्बल १६ कोटी