Share

Salman Khan: व्यायाम करताना मागे का ठेवली होती स्टीलची वाटी? सलमान खानचा ‘तो’ फोटो व्हायरल

Salman Khan, Body Building, Workout, Shirtless/ सलमान खान बॉलीवूडमधील फिट आणि पिळदार बॉडीसाठी ओळखला जातो. तरुणांमध्ये बॉडी बिल्डिंगची आवड निर्माण करण्याचे श्रेय सलमान खानला दिले जाते. 90 ते 2000, त्यानंतर 2010 पासून आत्तापर्यंत सलमान खानने व्यायामाच्या माध्यमातून शरीरसंवर्धन केले आहे. शर्ट काढून आपली वर्कआउट बॉडी दाखवायला सलमान खान मागेपुढे पाहत नाही.

सलमान खानच्या जवळपास प्रत्येक चित्रपटात असे दृश्य पाहायला मिळते, ज्यामध्ये तो शर्टलेस होऊन आपले पिळदार शरीर प्रेक्षकांना दाखवतो. मात्र यावेळी सलमान खानने जिममधून व्यायाम करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. किच्छा सुदीप-स्टार विक्रांत रोना या चित्रपटाचे प्रमोशन केल्यानंतर, सलमान खान त्याच्या नेहमीच्या रुटीनमध्ये परतला आहे.

अभिनेत्याने 9 ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर त्याच्या वर्कआउट बॉडीची झलक दाखवली आहे. अभिनेत्याने एक शर्टलेस फोटो अपलोड केला आहे ज्यामध्ये त्याची शरीरयष्टी त्याचे सर्वोत्तम कट दर्शवित आहे. जिममध्ये वर्कआऊट करताना सलमानच्या चेहऱ्यावर एक गंभीरता दिसून येते.

सलमान खानच्या या फोटोमध्ये त्याचे बायसेप्स, ट्रायसेप्स, बॉडी, 6 पॅक अॅब्स स्पष्ट दिसत आहेत. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये सलमान खान त्याचे अॅब्स फ्लॉंट करताना दिसत आहे. सलमान खानने शर्टलेससोबत ब्लॅक लोअर कॅरी केला आहे. सल्लूच्या कानात बाळी दिसत आहे, हलक्या शेवने त्याचा चेहरा खूप थकलेला दिसत आहे.

सलमान एका आधुनिक जिममध्ये दिसत आहे. आजूबाजूला हायटेक मशिन्स दिसतात. त्याचवेळी सलमान खानच्या मागे स्टूलवर एक स्टीलची वाटी ठेवण्यात आली आहे. ती वाटी रिकामी आहे किंवा त्यात पौष्टिक अन्न आहे की नाही याबद्दल कोणतीही पुष्टी नाही.

सलमान खानच्या या शर्टलेस फोटोने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. हा फोटो झपाट्याने व्हायरल झाला आहे. यावर इंटरनेट यूजर्सनी जबरदस्त कमेंट्स केल्या आहेत. या फोटोवर चाहत्यांनी हार्ट आणि फायर इमोजी शेअर केले आहेत. लोकांनी अभिनेत्याचे वर्णन ‘सर्वात मोठा फॅशन आयकॉन’ असे केले आहे.

महत्वाच्या बातम्या-
Shehnaz Gill : सलमान खानने शहनाज गिलची चित्रपटातून केली हकालपट्टी? स्वत: शहनाजने केला खुलासा, म्हणाली..
बॉलिवूडचे चित्रपट आता फ्लॉप का होत आहेत? अखेर सलमान खानने सोडले मौन, म्हणाला
सलमान खानने कधीच अरबाज खानला सपोर्ट केला नाही? इतक्या वर्षांनंतर मलायकाने केला खुलासा
..त्यामुळे मी माझ्या प्रत्येक चित्रपटात शर्ट काढतो, इतक्या वर्षांनंतर सलमान खानने उघड केले गुपित

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now