मॉडेलिंग आणि जाहिरातींच्या चित्रीकरणानंतर प्रीतीने मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. प्रितीची गणना बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत केली जाते. तिने बॉलिवूडला अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. मात्र, प्रिती गेल्या काही काळापासून चित्रपटांपासून दूर आहे. पण आयपीएलच्या सीजनमध्ये ती भारतातच असते. (Salman Khan’s relationship with Preity Zinta)
प्रिती झिंटाने (Preity Zinta) तिच्या करिअरमध्ये सलमान खानसोबत (Salman Khan) सर्वाधिक काम केले आहे. सलमान खान आणि प्रीती झिंटा हे देखील खूप चांगले मित्र आहेत पण, एक ऑडिओ टेप व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या लिंक अपची बातमी आली. या कथित ऑडिओ टेपमध्ये सलमानने ऐश्वर्या रायला प्रीतीसोबतच्या त्याच्या बेडरूममधील नातेसंबंधाबद्दल सांगितले होते. त्यादरम्यान प्रीती नेस वाडियासोबत रिलेशनशिपमध्ये होती.
या टेपवरून नेस वाडिया आणि प्रीती झिंटा यांच्यात बरीच चर्चा झाली होती. बातम्यांनुसार, जेव्हा नेसने प्रीतीकडे तिच्या वर्जिनिटीचा पुरावा मागितला तेव्हा दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले. आनंदाची गोष्ट म्हणजे नंतर ही टेप बनावट असल्याचे सिद्ध झाले परंतु त्यांनी ही टेप लीक करणाऱ्या संस्थेविरुद्ध गुन्हा दाखल केला.
प्रिती झिंटा आणि सलमान खानसोबतच मोठ्या पडद्यावर पाच वेळा एकत्र दिसले. ‘हर दिल जो प्यार करेगा’, ‘चोरी चोरी चुपके चुपके’, ‘दिल ने जिसे अपना कहा’, ‘जान ए मन’ आणि ‘हीरोज’ या चित्रपटांमध्ये दोघे एकत्र रोमान्स करताना दिसले होते. स्वत: प्रिती झिंटाने एकदा कबूल केले होते की तिला सलमानच्या नावाचे वेड आहे.
अलीकडेच, सलमान खानचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये हॉलीवूड अभिनेता जॉन ट्रावोल्टाला भेटताना दिसत आहे. सलमान खान सध्या अनेक प्रोजेक्टमध्ये बिझी आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो बिग बॉसमुळे आणखीनच व्यस्त होता. पण, आता बिग बॉस संपल्यानंतर सलमान खान त्याच्या चित्रपटांची शूटिंग सुरू करू शकतो. खासकरून सलमान खान ‘टायगर 3’चे उर्वरित शूटिंग पूर्ण करणार आहे. या चित्रपटाचीही प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सलमान खानचा मोस्ट अवेटेड ‘टायगर 3’ हा चित्रपट आहे ज्यामध्ये कतरिना कैफ त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय त्याच्याकडे ‘किक 2’, ‘कभी ईद कभी दिवाली’ आणि ‘बजरंगी भाईजान’चे सिक्वेल आहेत ज्यावर तो काम सुरू करणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
‘किराणा दुकानात आला दारूचा माल, लोकांचे होणार हाल’
महेश मांजरेकरांची लेक ‘या’ बॉलिवूड निर्मात्याच्या मुलाला करतीये डेट? सोशल मीडियावर रंगल्या चर्चा
मुलीने केलेले जंगी स्वागत पाहून भारावून गेला अल्लू अर्जुन, पोस्ट शेअर करत म्हणाला..
BIGG BOSS 15: गौहर खानच्या मते ‘हा’ व्यक्ती आहे विजेता, तेजस्वी प्रकाश जिंकल्यानंतर गौहर खान नाखूश?