बॉलिवूडचा दबंग खान सध्या त्याच्या आगामी ‘कभी ईद कभी दिवाली'(Kabhi Eid Kabhi Diwali) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याच्या विरुद्ध अभिनेत्री पूजा हेगडे दिसणार आहे. राधे श्याम, बीस्ट आणि आचार्य सारखे बिग बजेट चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर पूजा हेगडेसाठी ‘कभी ईद कभी दिवाली’ म्हणजे खूप काही आहे. चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. स्वत: पूजा हेगडेने फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली आहे.(salman-khans-lucky-bracelet-in-pooja-hegdes-hand-the-photo-went-viral)
अभिनेत्री पूजा हेगडेने(Pooja Hegde) तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोतील सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे अभिनेत्री सलमान खानचे लकी ब्रेसलेट परिधान करताना दिसत आहे. ब्रेसलेट फ्लॉंट करताना तिने स्वतः पोज दिली आहे. तसेच ईद कभी दिवालीच्या शूटिंगला सुरुवात झाल्याची माहिती देताना तिने लिहिले की, ‘शूट सुरू झाले आहे’.

सलमान खान(Salman Khan) नेहमीच त्याचे लकी ब्रेसलेट घालतो, पूजा हेगडेच्या हातात त्याचे दिसणे चर्चेचा विषय बनले आहे. तिच्या या पोस्टवर चाहते जोरदार कमेंट करताना दिसत आहेत. सलमान खान आणि पूजा हेगडे व्यतिरिक्त, दबंग खानचा मेहुणा आयुष शर्मा आणि अभिनेता झहीर इक्बाल देखील कभी ईद कभी दिवालीमध्ये दिसणार आहेत.
अलीकडेच अशीही बातमी आली होती की बिग बॉसची स्पर्धक असलेली पंजाबची अभिनेत्री शहनाज गिल देखील कभी ईद कभी दिवालीमध्ये दिसणार आहे. सलमान खानचा ‘कभी ईद कभी दिवाली’ हा चित्रपट कॉमेडी अॅक्शन थ्रिलर असणार आहे.

याची निर्मिती साजिद नाडियादवाला(Sajid Nadiadwala) करत आहेत. रिपोर्टनुसार हा चित्रपट 31 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. म्हणजेच यावेळी चाहते भाई जानच्या चित्रपटातून जुन्या वर्षाचा निरोप घेत नवीन वर्षाचे स्वागत करतील.






