Share

‘या’ माणसामुळे वाचला सलमान खानचा जीव, नाहीतर बंगल्याबाहेरच झाली असती त्याच्यावर फायरिंग

सलमान खानचे (Salman Khan) वडील सलीम खान यांना नुकतेच धमकीचे पत्र आले होते, ज्यामध्ये त्यांना आणि त्यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. ते सलमान आणि सलीमचे हाल सिद्धू मूसवालाप्रमाणे करतील, असे पत्रात लिहिले होते. तेव्हापासून पोलीस या प्रकरणाचा सातत्याने तपास करत आहेत. आता याप्रकरणी धक्कादायक बातमी समोर येत आहे.(Salman Khan, Salim Khan, letters, threats)

रिपोर्ट्सनुसार, एक शार्पशूटर सलमानला मारण्यासाठी त्याच्या घराबाहेर पोहोचला होता. सलमानला मुंबई पोलिसांचे संरक्षण मिळाले नसते, तर तो त्याच्या कार्यात यशस्वी झाला असता.  एका इंग्रजी न्यूज वेबसाईटच्या वृत्तानुसार, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील एका संशयिताला सलमानला मारण्यासाठी पाठवले होते. हा माणूस मॉडिफाईड हॉकीमध्ये छोटे शस्त्र लपवून सलमानच्या घराबाहेर पोहोचला होता.

या माणसाने सलमानला मारण्याचाही प्रयत्न केला, पण तो थोडक्यात बचावला. पोलिसांनी पकडले जाण्याच्या भीतीने अखेरच्या क्षणी त्याने माघार घेतली. असे सांगितले जात आहे की, ज्या दिवशी तो शार्पशूटर सलमानला लक्ष्य करत त्याच्या घराबाहेर उपस्थित होता, तेव्हा मुंबई पोलिसांचा एक एस्कॉर्ट सलमानसोबत होता. कारण त्यादिवशी सलमानला एका खाजगी कार्यक्रमात हजेरी लावायची होती.

जेव्हा शार्पशूटरने पोलिस अधिकाऱ्याला पाहिले तेव्हा तो घाबरला आणि त्याने आपल्या साथीदारासह परत जाणे चांगले मानले. विशेष म्हणजे, गुरुवारी मुंबई पोलिसांच्या हवाल्याने असे वृत्त आले होते की, सलमानच्या नावाने धमकीचे पत्र टाकण्यासाठी राजस्थानच्या जालोर येथून तीन लोक मुंबईत आले होते. हे तिघेही पत्र टाकल्यानंतर सिद्धू मुसेवाला खून प्रकरणातील संशयित सौरभ कांबळे यालाही भेटले होते, असेही पोलिसांनी सांगितले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ याने त्यांना ही सर्व माहिती दिली होती. सलमानला धमकावण्यामागे लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हेतू खंडणी मागण्याचा होता, असेही सौरभने पोलिसांना सांगितले होते. या सर्व प्रकरणाची पोलीस कसून तपासणी करत आहे. लवकरच पोलिसांना या प्रकरणाविषयी अजून माहिती मिळेल असाही दावा केला आहे.

महत्वाच्या बातम्या-
काळवीट मारूनही सलमान खटल्यातून निर्दोष सुटला, पण आम्ही त्याला सोडणार नाही, त्याचा कार्यक्रम होणारच
सलमानला मारण्याचा पुर्ण प्लॅन झालाच होता मात्र या गोष्टीमुळे फसला कट; बिश्नोईचा चौकशीत खळबळजनक खुलासा
सलमानचा एकदा कार्यक्रम करु द्या, मग मी कधीच काही करणार नाही; बिश्नोईच्या भावाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
मैने प्यार कियाच्या सेटवर सलमान लक्ष्मीकांत बेर्डे सोबत एक शब्दही बोलत नसायचा; खरे कारण आले समोर

ताज्या बातम्या क्राईम बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now