Share

सलमान खान लवकरच करणार लग्न, रिलेशनशिपबाबत केला मोठा खुलासा, म्हणाला..

सलमान खान

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या लग्नाची सर्वच आतुरतेने वाट पाहत आहेत. गेल्या काही वर्षांपासून याबाबत सतत चर्चा सुरु आहे. काही अफवाही आहेत. सलमाननी लग्न करावे अशी सर्वच चाहत्यांची इच्छा आहे. सर्वच चाहते सलमानच्या लग्नाची वाट पाहत आहेत.(Salman Khan will get married soon, big revelation about relationship, said ..)

अशातच सलमान खूप दिवसांपासून स्वतःला सिंगल म्हणवतो. पण आता त्याने स्वतःच्या रिलेशनशिप स्टेटसचा खुलासा केला आहे, जे ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. बिग बॉस १५ च्या ग्रँड फिनालेमध्ये सलमान खानने याबाबत मोठा खुलासा केला आहे. पहिल्यांदाच सलमान या विषयावर बोलला आहे.

बिग बॉस १३ ची स्पर्धक शहनाज गिल या शोमध्ये येणार आहे जिच्यासोबत सलमान स्टेजवर मजामस्ती करताना दिसणार आहे. तर शहनाजदेखील सलमानची गुपिते उघडी करताना दिसणार आहे. आता अखेर सलमान स्वतःच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल सर्वांना सांगणार आहे. या शोचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

या प्रोमोमध्ये शहनाज गिल सलमानला कतरिना कैफचे नाव घेऊन चिडवताना दिसते. तसेच शहनाज सलमानची गुपिते उघडी करण्याचा प्रयत्न करत आहे. शहनाज या व्हिडिओमध्ये म्हणते की मी पंजाबच्या कतरिना कैफपासून भारताची शहनाज गिल बनले आहे. कारण भारताची कतरिना कैफ पंजाबची कतरिना झाली आहे.

शहनाजचे म्हणणे ऐकल्यानंतर सलमान खान म्हणतो की, हे बरोबर आहे. सगळे खूश आहेत. यावर शहनाज सलमानला म्हणते की सर तुम्ही पण खुश राहा. यावर सलमान म्हणतो की मी जास्त बोललो नाही ना. यावर ती म्हणते की सर सिंगल अधिक चांगले दिसतात. यानंतर शहनाज विचारते की, तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात का? यावर सलमान हो म्हणतो.

नॅशनल टीव्हीवर सलमान खानने त्याच्या रिलेशनशीप बदद्ल खुलासा केल्यानंतर सर्व चाहत्यांना धक्काचं बसला. आता सलमानने डेटिंग बाबत कबुली दिल्याने तो लवकरच लग्न बंधनात अडकण्याची शक्यता आहे. आता चाहत्यांनाही भाईजानच्या होणाऱ्या पत्नीचा चेहरा पाहण्याची उत्सुकता लागली आहे. पण सलमान कोणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे ते अजूनसुद्धा समोर आले नाही.

महत्वाच्या बातम्या
दोन तरुणींसोबत प्रेमसंबंध ठेवणे तरुणाला पडले महागात; असा गेला जीव की वाचून हादरुन जाल
भारतीय हवामान विभागाने दिला धोक्याचा इशारा, देशातील ‘या’ भागात पडणार गारपिठीसह पाऊस

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now