Share

सलमान खान मेगास्टार चिरंजीवींच्या ‘या’ चित्रपटात फ्रीमध्ये करणार काम; साऊथमध्ये करणार दमदार एन्ट्री

Godfather

बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान (Salman Khan) बॉलिवूडनंतर आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. सलमान खान लवकरच तेलुगु सिनेसृष्टीतील मेगास्टार चिरंजीवी (Chiranjeevi) यांच्यासोबत ‘गॉडफादर’ (Godfather) या चित्रपटात दिसणार आहे. चिरंजीवी यांनी स्वतः सोशल मीडियाद्वारे याबाबत घोषणा करत सलमान खानचे स्वागत केले आहे.

चिरंजीवी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर सलमान खानसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ते सलमान खानला पुष्पगुच्छ देताना दिसून येत आहेत. फोटो शेअर करत चिरंजीवी यांनी लिहिले की, ‘भाई ‘गॉडफादर’ चित्रपटात तुमचे स्वागत. तुमच्या एंट्रीने सर्वांमध्ये एक नवीन ऊर्जा आली आहे. सर्वांचा उत्साह अधिक वाढला आहे’.

चिरंजीवी यांनी पुढे लिहिले की, ‘तुमच्यासोबत स्क्रीन शेअर करणे खूपच आनंदाची गोष्ट आहे. तुमची उपस्थिती प्रेक्षकांमध्ये अधिक जोश घेऊन येईल’. यासोबत चिरंजीवी यांनी ट्विटमध्ये ‘गॉडफादर’ चित्रपटाचे दिग्दर्शक जयम मोहनराज आणि मुलगा रामचरणालाही टॅग केले. अशात दोन मोठ्या कलाकारांना एकत्र पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत.

पिंकविलाच्या रिपोर्टनुसार सलमान खान या चित्रपटात केमिया करणार आहे. यासाठी त्याला मोठी रक्कम ऑफर करण्यात आली. पण त्याने ही रक्कम नाकारली. रिपोर्टनुसार सलमान खानने पहिल्याच दिवशी हे स्पष्ट केले होते की, तो चिरंजीवी यांच्या प्रती असणारा आदर आणि प्रेम यासाठी हा चित्रपट करणार आहे. त्यामुळे तो चित्रपटासाठी कोणतीही फी आकारणार नाही आणि फ्रीमध्ये चित्रपट करणार.

दरम्यान ‘गॉडफादर’ हा चित्रपट मल्याळममधील ‘लुसिफर’ या चित्रपटाचा रिमेक आहे. हा एक पॉलिटिकल अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहन राजा करणार आहेत. बातम्यानुसार, यामध्ये सलमान खानचा अॅक्शन अवतार पाहायला मिळणार आहे. मल्याळम चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारनने साकारलेली भूमिका आता या चित्रपटात सलमान खान साकारणार आहे.

तसेच या चित्रपटासाठी सलमान कर्जत एनडी स्टुडिओमध्ये एक आठवडा चित्रीकरण करणार आहे. यामध्ये त्याचे काही सीन्स चिरंजीवी यांच्यासोबत असणार आहेत. तसेच दोघे एका गाण्यातही दिसून येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. चिरंजीवी आणि सलमान खान यांच्यासोबत या चित्रपटात नयन तारा, सत्यदेव कंचरण, प्रकाश राज यासारखे कलाकार दिसणार आहेत.

सलमानच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास तो ‘अंतिम’ या चित्रपटात शेवटचा दिसला होता. लवकरच तो ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटात दिसणार आहे. सध्या सलमान ‘टायगर ३’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा सलमान आणि कतरिनाची जोडी प्रेक्षकांना पडद्यावर पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय सलमान खान शाहरूख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटातही केमियो करताना दिसणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
माझे मन काश्मिरसाठी रडते, राजकारण आणि दहशतवादाने.., अनुपम खेर यांचे ते ट्विट पुन्हा झाले व्हायरल
यामी गौतमनेही द काश्मिर फाईल्सचे केले कौतुक, म्हणाली, काश्मिरी पंडिताशी लग्न केल्यामुळे मला..
प्रत्येक सीननंतर चिन्मय मांडलेकरला द्याव्या लागत होत्या ‘भारत माता की जय’ च्या घोषणा, कारण वाचून अवाक व्हाल

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now