Share

VIDEO: धर्मवीर ट्रेलर लाँचदरम्यान सलमान खानने केलं असं कृत्य, शिवसैनिकांनीही केलं कौतुक

Anand Dighe

लोकनेते म्हणून ओळखले जाणारे आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘धर्मवीर – मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काहीच दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. तर या टीझरला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता नुकतीच चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.

या ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, अभिनेता सलमान खान, रितेश देशमुख असे अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होते. यावेळी सलमान खानने असं कृत्य केलं ज्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

ट्रेलर लाँचदरम्यान कार्यक्रमास उपस्थित सर्व पाहुण्यांना स्टेजवर आमंत्रित करण्यात आलं. त्यानंतर सर्व पाहुणे छत्रपती शिवाजी महाराज, दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत आनंद दिघें यांच्या प्रतिमांसमोर नतमस्तक झाले. यावेळी सलमान खानची एक कृती लक्षवेधी ठरली.

सलमान खानने या सर्व आदर्श व्यक्तिमत्त्वांसमोर नतमस्तक होण्यापूर्वी आपले शूज काढले. त्यानंतर सर्व प्रतिमांसमोर फुले अर्पण करत त्याने हात जोडून नमस्कार केला. सलमानची ही कृती त्याच्या चाहत्यांना आणि शिवसैनिकांना खूपच भावली. सध्या त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

यावेळी बोलताना सलमान खानने त्याच्यात आणि आनंद दिघे यांच्यात साम्य असल्याचे म्हटले. सलमानने म्हटले की, ‘आताच मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलत होतो तेव्हा त्यांनी आनंद दिघे यांच्याबद्दल एक गोष्ट सांगितली. आनंद दिघे एकाच बेडरूममध्ये राहत होते, असे त्यांनी म्हटलं. तर मी सुद्धा एकाच बेडरूममध्ये राहतो’.

‘आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा झाली तेव्हा त्यांनी म्हटलं की, आनंद दिघे यांचं लग्न झालं नव्हतं. तर माझंसुद्धा लग्न झालं नाही. त्यामुळे आमच्या दोघात काही प्रमाणात साम्य आहे’, असे सलमानने यावेळी म्हटले. तसेच हा चित्रपट खूप मोठा हिट व्हावा, अशी सदिच्छाही त्याने यावेळी व्यक्त केली.

दरम्यान, ‘धर्मवीर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे करीत असून यामध्ये अभिनेता प्रसाद ओक आनंद दिघेंच्या भूमिकेत दिसणार आहे. तर १३ मे २०२२ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ठाण्याचा वाघ म्हणून ओळख असणाऱ्या आनंद दिघेंवर चित्रपट येणार असल्याने सगळीकडे याच चित्रपटाची चर्चा रंगली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
मातृदिनानिमित्त आईचे उत्तम उदाहरण! लहान वयात पतीचा मृत्यू, शेती करून मुलांना बनवले अधिकारी
लॉकअपचा विजेता मुन्नवर फारुकीचे आयुष्य होते वादग्रस्त, कधी रडला तर कधी हसला
कपील शर्माचे वर्षानुवर्षे जुने स्वप्न झाले पूर्ण, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत फोटो पोस्ट करत म्हणाला…

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now