बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान (Salman Khan) नेहमी काही ना काही कारणाने माध्यमात चर्चेत असतो. त्याच्यासंबंधित अनेक गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. चाहतेही त्याच्यासंबंधित प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यास नेहमी उत्सुक असतात. आताही सलमानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये सलमान त्याच्या हातात असणाऱ्या ब्रेसलेटबद्दल सांगत आहे.
सलमान खानच्या हातात निळ्या रंगाचा खडा असलेला एक ब्रेसलेट नेहमी पाहायला मिळतो. तो कुठेही गेला तरी हातात ब्रेसलेट घालणे विसरत नाही. कारण हे ब्रेसलेट त्याच्यासाठी खूप मौल्यवान आहे. हे ब्रेसलेट सलमानला नकारात्मक उर्जेपासून वाचवते, अशी सलमानची समजूत आहे. याचा खुलासा स्वतः सलमानने केला होता. त्याचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल होणारा व्हिडिओ सलमानच्या एका फॅन पेजवर शेअर करण्यात आलेला आहे. यामध्ये दिसत आहे की, सलमानची एक चाहती त्याला विचारते की, ‘मला तुम्हाला तुमच्या ब्रेसलेटबाबत प्रश्न विचारायचे आहे जे तुम्ही नेहमी तुमच्या हातात घालता. तुम्ही हे ब्रेसलेट नेहमी घालण्यामागचे कारण काय?’
https://www.instagram.com/p/Cc0I3F0vVxx/
यावर उत्तर देताना सलमान म्हणतो की, ‘माझे वडिल नेहमी त्यांच्या हातात हे ब्रेसलेट घालत असत. आणि ते मला खूप आवडत असत. जेव्हा मी लहान होतो तेव्हा या ब्रेसलेटसोबत मी खेळत असे. पण जेव्हा मी माझ्या करिअरची सुरुवात केली तेव्हा माझ्या वडिलांनी त्यांच्या हातात असणाऱ्या ब्रेसलेटसारखाच दुसरा एक ब्रेसलेट मला गिफ्ट म्हणून दिला. तेव्हापासून हे ब्रेसलेट माझ्या हातात आहे’.
https://www.instagram.com/p/CXkacesLiqX/?utm_source=ig_web_copy_link
सलमान पुढे म्हणतो की, ‘या ब्रेसलेटमध्ये जो खडा आहे त्याला फिरोजा म्हणतात. यामुळे मला सकारात्मक उर्जा मिळते. हा खडा नकारात्मक उर्जा माझ्याजवळ येण्यापासून रोखतो. जेव्हा नकारात्मकता वाढते तेव्हा आपोआपच हा खडा तुटतो. आतापर्यंत ७ वेळा हा खडा तुटला आहे’, असेही सलमान यावेळी सांगतो.
दरम्यान, सलमानच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास लवकरच तो ‘कभी ईद कभी दिवाली’ आणि ‘टायगर ३’ या चित्रपटात दिसणार आहे. ‘कभी ईद कभी दिवाली’ हा चित्रपट यावर्षी ३१ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. तर ‘टायगर ३’ पुढील वर्षी २१ एप्रिल २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
मंगेशकर कुटुंबाची उंची किती? आपली उंची किती? बोलतो किती?, भाजपचा आव्हाडांवर हल्लाबोल
आलिया भट्ट-रणबीर कपूरचा २००४ मधील ‘तो’ फोटो व्हायरल, ११ वर्षांच्या वयातच दोघांना झाले होते प्रेम
आता इरफान पठानने केला अमित मिश्रावर पलटवार, म्हणाला, मी प्रत्येक नागरिकाला त्याचे पालन करण्याचे..