बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) सध्या ‘कभी ईद कभी दिवाली’ या त्याच्या आगामी चित्रपटामुळे माध्यमात चर्चेत आहे. सलमानचे चाहते त्याच्या या चित्रपटासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. यादरम्यान या चित्रपटाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. ‘कभी ईद कभी दिवाली’मधून अभिनेता श्रेयस तळपदे आणि अरशद वारसीला डच्चू देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
एका न्यूज पोर्टलच्या वृत्तानुसार, सलमान खानच्या आगामी ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटात अरशद आणि श्रेयस सलमान खानच्या भावाची भूमिका साकारणार होते. परंतु आता चित्रपटातून त्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. तर त्यांच्या जागी आता सलमानचा मेव्हणा आयुष शर्मा आणि जहीर इकबाल हे दोघे सलमानच्या भावांची भूमिका साकारणार आहेत.
सलमान खानमुळे या दोघांना चित्रपटातून रिप्लेस करण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. तसेच दुसरीकडे असेही सांगितले जात आहे की, आयुष शर्माला सुरुवातीलाच या चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती.
परंतु, चित्रपटात त्याची भूमिका फारच कमी आहे, असे आयुषला वाटल्याने त्याने ‘कभी ईद कभी दिवाली’ चित्रपटास नकार दिला होता. तर आता पुन्हा एकदा आयुषने चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे सलमानने पुन्हा आयुषला संधी देण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
आयुष शर्माने २०१८ साली आलेल्या ‘लवरात्री’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तो सलमानसोबत ‘अंतिम’ या चित्रपटात दिसला. तर जहीर इकबालने २०१९ साली आलेल्या ‘नोटबुक’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. तर आता हे दोघेही ‘कभी ईद कभी दिवाली’ चित्रपटात दिसणार आहेत.
दरम्यान, दिग्दर्शक फरहाद दामजी ‘कभी ईद कभी दिवाली’ चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटात पूजा हेगडे सलमानची अभिनेत्री असणार आहे. सलमान आणि पूजा पहिल्यांदाच या चित्रपटाद्वारे एकत्र काम करताना दिसणार आहेत. तसेच दक्षिणेकडील प्रसिद्ध अभिनेता व्यंकटेशसुद्धा या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ३० डिसेंबर २०२२ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
VIDEO: धन्यवाद हा शब्दही तुमच्यासमोर छोटा पडेल, ‘KGF 2’ ला मिळालेले यश पाहून भारावून गेला यश
आलियाला सून बनवण्यासाठी कपूर कुटुंबाला साईन करावे लागले हे कॉन्ट्रॅक्ट, वाचा काय लिहीलंय त्यात?
मालाबार गोल्डच्या नवीन जाहिरातीमुळे नेटकरी संतापले, होतेय बहिष्कार टाकण्याची मागणी