Share

सलमान खानचे सोनाक्षी सिन्हासोबत झाले लग्न? त्या व्हायरल फोटोबाबत स्वता सोनाक्षीने केला खुलासा

काही दिवसांपूर्वी सोनाक्षी सिन्हाचा (Sonakshi Sinha) एक फोटो व्हायरल झाला होता ज्यामध्ये सलमान खान (Salman Khan) तिला अंगठी घालताना दिसत होता. फोटोमध्ये सोनाक्षीने भांगात कुंकू भरून वधूसारखी वेशभूषा करताना दिसली, त्यानंतर लोकांनी असा अंदाज लावला की तिने सलमानसोबत गुपचूप लग्न केले आहे. मात्र, काही लोकांनी हे फोटो खोटे असल्याचेही सांगितले. आता सोनाक्षी सिन्हाने इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या फोटोवर आपले मौन तोडले आहे आणि प्रतिक्रिया दिली आहे.(Salman Khan married Sonakshi Sinha)

या वृत्तावर सोनाक्षी सिन्हा हिने प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, जे हा फोटो खरा मानतात ते मूर्खापेक्षा कमी नाहीत. इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या फोटोवर कमेंट करताना तिने लिहिले की, “तुम्ही इतके मूर्ख आहात की तुम्हाला मूळ आणि मॉर्फ केलेला फोटो यातील फरक कळू शकत नाहीस. यासोबतच अभिनेत्रीने तीन हसणारे इमोजीही तयार टाकले आहेत.

photo

सोनाक्षी सिन्हाने 2010 मध्ये सलमान खानच्या ‘दबंग’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते ज्यामध्ये तिने रज्जोची भूमिका केली होती. या चित्रपटातील सोनाक्षीचे काम प्रेक्षकांना खूप आवडले होते. याशिवाय सोनाक्षीने सलमानसोबत ‘दबंग 2’ आणि ‘दबंग 3’ मध्येही काम केले आहे. सध्या सोनाक्षी सिन्हा तिच्या ‘डबल एक्सएल’ या नवीन चित्रपटामुळे चर्चेत आहे ज्यामध्ये ती हुमा कुरेशीसोबत दिसणार आहे.

सलमान खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या तो ‘टायगर 3’चित्रपटामुळे चर्चेत आहे, ज्यामध्ये तो कॅटरिना कैफसोबत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर शेअर करण्यात आला, ज्याला चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. हा चित्रपट 21 एप्रिल 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय सलमान खानकडे ‘किक 2’ आणि ‘कभी ईद कभी दिवाळी’ सारखे चित्रपट आहेत जे एकामागून एक चित्रपटगृहात दाखल होतील.

दुसरीकडे, सोनाक्षी सिन्हा डिजिटल डेब्यू करणार आहे. ती दोन वेब सिरीजमध्ये दिसणार आहे. त्यापैकी एकाचे नाव फॉलेन आहे आणि ही वेब सिरीज Amazon Prime Video वर दिसणार आहे. सोनाक्षीचे चाहते तिला वेबसिरीजमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

महत्वाच्या बातम्या-
सुपरहिट!झुंडने चित्रपटगृहात घातलाय धुमाकूळ, पहिल्याच दिवशी कमावले तब्बल एवढे कोटी
मृत्यूपूर्वी शेन वॉर्न ज्या बेटावर गेला होता त्याचे रहस्य काय? एकांतवासासाठी लोक जातात या ठिकाणी
करोडोंच्या संपत्तीची मालकिन आहे श्रद्धा कपूर, महिन्याची कमाई एकून तोंडात बोटं घालाल
रशियाने १५ वर्षांत सर्वोत्तम सैन्य कसं उभारलं? ज्याला घाबरून अमेरिकासुद्धा थरथर कापतीय; जाणून घ्या..

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now