बॉलिवूड विश्वातील अभिनेता सलमान खान आणि ऐश्वर्या रायचे प्रेमप्रकरण सर्वांनाच ठाऊक आहे. म्हणले जाते की, 2002 मध्ये ऐश्वर्यावर चिडून सलमानने तिला कानाखाली लावली होती. यासंबंधीत अनेक गंभीर आरोप स्वतः ऐश्वर्याने सलमानवर केले होते. यानंतर या दोघांच्यात दुरावा येण्यास सुरुवात झाली. आता घटनेला कित्येक वर्ष उलटून गेली आहेत.
सलमान आणि ऐश्वर्या आपल्या आयुष्यात खूप पुढे आले आहेत. परंतु या सर्व गोष्टी सलमान खान विसरलेला दिसत नाही. नुकताच त्याला एका पत्रकाराने, तुमच्यावर हिंसा केल्याचा आरोप होता, सर्व फिल्म मॅगझिनची ती एक मोठी स्टोरी होती, तुम्ही कधी कोणत्या महिलेवर हात उगारला आहे का? असा प्रश्न विचारला होता.
यावर उत्तर देताना सलमानने सांगितले की, ‘हो, आता त्या महिलेने सांगितले आहे. मला असे म्हणायचे आहे की, प्रभू चावला एक पत्रकार होते ज्यांनी मला खूप वर्षांपूर्वी हा प्रश्न विचारला होता. म्हणून मी फक्त टेबलावर हात आपटला होता आणि ते घाबरले, त्यावेळी टेबल तुटले होते.
जर मी कुणाला मारले तर ते भांडण आहे, मला राग येणारच आहे. मी मारताना माझा सर्वोत्तम शॉट देणार आहे. मला वाटत नाही की ती हे सहन करू शकली असती. त्यामुळे हे खरे नाही.’ दरम्यान सलमानने कित्येक वर्षांनंतर आपल्यावर असलेल्या हिंसेच्या आरोपाविषयी भाष्य केले आहे.
सलमानच्या या उत्तरानंतर ऐश्वर्यासोबतचे त्याचे नाते पुन्हा चर्चेत आले आहे. 2001 च्या काळात सलमान आणि ऐश्वर्याच्या नात्यात जास्त दुरावा येण्यास सुरूवात झाली होती. याकाळात सलमानने ऐश्वर्यावर दुसऱ्या व्यक्तीसोबत अफेयर असल्याचा गंभीर आरोप लावला होता.
आपला राग अनावर झाल्यामुळे सलमानने ऐश्वर्याला मारले असल्याचे समोर आले होते. आजही बॉलिवूडमध्ये झालेल्या सर्वात वाईट ब्रेकअपपैकी सलमान-ऐश्वर्याचे ब्रेकअप मानले जाते. आता या दोघांच्या ब्रेकअपला कित्येक वर्षे होऊन गेली आहेत. ऐश्वर्या अभिनेता अभिषेक बच्चनसोबत आपल्या संसारात पुर्णपणे गुंतली आहे. तर इकडे सलमान आपल्या कामात व्यस्थ आहे. परंतु अधून मधून या दोघांच्या प्रेमाच्या चर्चा सोशल मीडियावर होताना दिसतात.
महत्वाच्या बातम्या
ST कर्मचाऱ्यांच्या धुडगूस प्रकरणात हाती लागली मोठी माहिती, FIR मधून झाले खळबळजनक खुलासे
देशाने मला फक्त प्रेमच दिलं नाही, तर जोडेही मारले आहे पण…; वाचा राहूल गांधी नक्की काय म्हणाले?
पुणे हादरलं! १२ वर्षीय मुलीवर स्टेशन परिसरातील सार्वजनिक शौचालयात बलात्कार, आरोपी फरार
21 वर्षानंतर कोल्हापूरला मिळाली महाराष्ट्र केसरीची मानाची गदा; अंतिम लढतीत पृथ्वीराज पाटील विजयी