बॉलिवूडचा भााईजान सलमान खान आणि दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा (Salman Khan and Sonakshi Sinha) सध्या माध्यमात फारच चर्चेत आहे. सलमान आणि सोनाक्षीचा एक फोटो व्हायरल होत असून यामुळे दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. तर कोणता आहे हा फोटो आणि या फोटोमागील सत्य काय ते जाणून घेऊया.
सोनाक्षी सिन्हाने २०१० साली ‘दबंग’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. सलमान खानने तिला सिनेसृष्टीत लाँच केले. तर ‘दबंग’ चित्रपटातील सलमान-सोनाक्षीच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली. तसेच तेव्हा त्या दोघांच्या रिलेशनशीपबाबतही चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर आता या दोघांच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सलमान-सोनाक्षीच्या या व्हायरल फोटोमुळे दोघांनी गुपचुप लग्न केलं आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. पण व्हायरल होणारा त्यांचा हा फोटो खरा नसून तो एडिट केलेला आहे. या फोटोत सोनाक्षी रेड कलरची साडी नेसलेली असून ज्वेलरी आणि सिंदूर लावलेल्या लूकमध्ये दिसत आहे. तर सलमान व्हाईट शर्ट आणि क्रिम कलरचा ब्लेजर या आऊटफिटमध्ये दिसत आहे.
दोघेही या फोटोत खूपच सुंदर दिसत आहेत. हा फोटो पाहून तो एडिट केलेला आहे, असे अजिबात वाटत नाही. पण हा सर्व फोटोशॉपीचा कमाल असून भाईजान अद्यापही सिंगलच आहे. दरम्यान, सलमानचे नाव यापूर्वी जॅकलिन फर्नांडिस, जरीन खान, कतरिना कैफ अशा अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले. आताही तो युलिया वंतूरसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याच्या जोरदार चर्चा रंगत आहेत.
दुसरीकडे सोनाक्षी सिन्हाचेही नाव जहीर इकबालसोबत जोडण्यात येत आहे. सोनाक्षी जहीरसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा आहे. परंतु, एका मुलाखतीत बोलताना सोनाक्षीने या बातम्या केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे. मुलाखतीत तिने सांगितले की, ती जहीर इकबालसोबत रिलेशनशीपमध्ये नाही. तो केवळ तिचा चांगला मित्र आहे.
दरम्यान, सलमानच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास लवकरच तो ‘टायगर ३’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय सलमान ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटातही दिसणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
PHOTO: लतादीदींच्या नातीसमोर फिक्या पडतील सगळ्या अभिनेत्री, सचिन तेंडूलकरसोबत आहे खास कनेक्शन
१७ व्या वर्षी ‘या’ अभिनेत्यासोबत लिव्ह इनमध्ये राहत होती कंगना, त्याच्या बायकोला कळलं अन्..
अनेकांच्या मनावर राज्य करणारी रश्मिका मंदाना सोडणार होती चित्रपटसृष्टी, ‘हे’ होते कारण