laxmikant berde | सलमान खानचा (salman khan) प्रमुख भूमिका असलेला पहिलाच चित्रपट ‘मैने प्यार किया’ (maine pyar kiya). त्यावेळी प्रचंड गाजलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. खरतर या चित्रपटाच्या वेळी सलमान खान खूपच लहान दिसत होता. तो या भूमिकेसाठी योग्य नाही असे दिग्दर्शक सुरज बडजात्याचे मत होते, परंतु कालांतराने त्यांचे हे मत बदलून त्यांनी या भूमिकेसाठी सलमान खानवर शिक्कामोर्तब केला. (when salman not talking to lakshya on the set of maine pyar kiya)
या चित्रपटात प्रमुख भूमिकेत सलमान खान सोबत अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन ही होती. तसेच मराठी सृष्टीतील सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे (laxmikant berde) हे देखील होते. या चित्रपटाच्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे यांचे हिंदी चित्रपट सृष्टीत पहिलेच पाऊल पडले. त्या आधी त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाने चाहत्याच्या मनावर राज्य केले होते.
खूप वर्षांपूर्वी मुलाखतीदरम्यान लक्ष्मीकांत बेर्डे यांनी ‘मैने प्यार किया’ चित्रपटातील एक किस्सा सांगितला होता. त्यांनी सांगितले होते की, सलमान खान शुटींग सेटवर माझ्यासोबत बोलत नव्हता. त्याच बरोबर त्यांनी अनेक गोष्टींचे उलगडे केले.
लक्ष्मीकांत म्हणाले की, मी मराठी अभिनेता असल्याने तसेच मराठी सृष्टीत त्यावेळी माझे चाहते प्रचंड प्रमाणात होते, त्यामुळे सलमान खान थोडासा घाबरूनच होता. मैने प्यार किया चित्रपटाच्या वेळी सलमानला कोणीतरी सांगितले होते की लक्ष्मीकांत पासून सावध राहा. तो ऐनवेळी स्क्रिप्ट मध्ये ऍडिशन करतो.
या सर्व गोष्टींमुळे सलमान खान लक्ष्मीकांत यांच्यासोबत बोलत नव्हता. मग लक्ष्मीकांत यांनी स्वतः जाऊन त्याला विचारल की तू असा का वागतोस? जोपर्यंत आपल ट्युनिग होत नाही तोपर्यंत आपले सीन चांगले होणार नाही. भाग्यश्री तर लक्ष्मीकांत यांची चांगलीच फॅन होती त्यामुळे त्यांची मैत्री लवकर झाली.
त्याच चित्रपटातील एक किस्सा सांगताना लक्ष्मीकांत म्हणाले आम्हाला दोघांना एकत्रित सीन करायचा होता त्यावेळी डायरेक्टरला मी स्वतः जाऊन सांगितलं की हा आमचा दोघांचा सिन आहे मला यातून अव्हॉइड करा नाहीतर सगळी लोकं माझ्याकडे बघत बसतील, या गोष्टीवरून सलमान खानला त्याची चूक कळाली आणि त्याने एकत्र सीन देण्यास सहकार्य केले.
लक्ष्मीकांत यांनी याबाबत एक अगदी लाखमोलाची गोष्ट सांगितली, ‘मराठी सृष्टीत आम्ही असंच करतो आम्ही सर्व कलाकार नेहमीच एकत्र राहतो.’ अशोक सराफ यांच्यासोबत मी अनेकदा काम केलं एक धाकटा भाऊ म्हणून मला खूपदा त्यांनी सांभाळून घेतलं आहे. त्यांनी कधीच आपलं सिनिअर असणं दाखवून दिलं नाही. त्यामुळेच लोकं म्हणतात की ही दृष्ट लागण्यासारखी जोडी आहे.
तसेच या मुलाखतीत त्यांनी आणखी एक किस्सा सांगितला, एकदा जितेंद्र यांची स्टाईल असलेली टाईट पॅन्ट घातली होती. त्या टाईट पॅन्ट मुळे खरं तर धड उठताही येत नव्हत आणि बसताही येत नव्हत. शेवटी ती पॅन्ट फाटली म्हणून त्यांना आईच्या हातचा मार खावा लागला होता.
असे हे लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठी सृष्टीतील दिलखुलास व्यक्तिमत्व असलेले होते. तसेच त्यांनी विनोदाचा बादशहा म्हणून अनेकांच्या मनात जागा केली होती. ते अनेक धमाल किस्से सांगून आपल्या सहकलाकाराना हसवत असे तसेच आपले अनुभव सांगत असे.
महत्वाच्या बातम्या
Crime news : हृदय पिळवटून टाकणारी घटना; लटकलेल्या वायरचा बैलाला शाॅक अन् मालकासहीत सगळेच ठार
Ankita Bhandari: भाजपच्या माजी मंत्र्याच्या मुलाने १९ वर्षीय अंकिताची हत्या का केली? पोलिस चौकशीत झाला हैराण करणारा खुलासा
Gold: सोनं घेण्याची सुवर्णसंधी! सोन्याने गाठला सहा महिन्यांचा नीचांकी दर, ‘एवढ्या’ हजारांनी झाले स्वस्त
Tennis players: असा खेळाडू होणे नाही! शेवटच्या मॅचमध्ये लहान मुलासारखा रडला फेडरर, नडालचेही डोळे आले भरून