सध्या एस.एस.राजामौली यांचा आरआरआर हा चित्रपट 25 मार्च ला प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. त्यांची कमाई पाहता आता अभिनेता सलमान खान याने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नुकताच विवेक अग्निहोत्री यांच्या’द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाने बॉक्सऑफीसवरती धुमाकूळ घातला. त्यानंतर जेव्हा पासून आरआरआर चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हापासून सर्वत्र आरआरआर चित्रपटाची चर्चा होताना दिसत आहे. या चित्रपटाची एकूण भारतातील कमाई 91.50 कोटी इतकी आहे.
माहितीनुसार, या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 19 कोटींची कमाई केली आहे. ट्रेड अँनालिस्ट तरण आदर्शच्या रिपोर्टनुसार, केवळ भारतातच नाही तर अमेरिका, कॅनडा आणि USA या देशांमध्ये देखील हा चित्रपट चांगली कमाई करत आहे. युनायटेड किंगडममध्ये या चित्रपटानं 2.40 कोटींची कमाई केली आहे.
काल दिवसभरात या सिनेमाने 17 कोटी कमावले आहेत. या सिनेमाची एकूण भारतातील कमाई 91.50 कोटी इतकी आहे. तर RRR या चित्रपटाच्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईचा आकडा समोर आला आहे. या ब्लॉकबस्टर चित्रपटाने जगभरातील कमाईचे विक्रम मोडले आहेत.
रविवारी या चित्रपटाने 118 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. त्यामुळे या चित्रपटाच्या पहिल्या वीकेंडची जगभरातील कमाई ही तब्बल 490 कोटी रुपये इतकी झाली आहे. चित्रपटाला मिळणारे घवघवीत यश पाहता अभिनेता सलमान खान याने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
सलमान खान म्हणाला, मी चिरंजीवी यांच्यासोबत काम केलं आहे. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव अप्रतिम होता. त्यांचा मुलगा रामचरणही माझा मित्र आहे. रामचरणने आरआरआर सिनेमात खूप दमदार काम केलं आहे. या सिनेमाला जे यश मिळत आहे, याचा मला आनंद आहे,पण मला कळत नाही की आमचा चित्रपट साऊथमध्ये एवढा का चालत नाही? असा त्याने प्रश्न केला.