Share

‘द कश्मीर फाईल्स’चित्रपट पाहून सलील कुलकर्णी म्हणाले, ‘टूटे हुए लोग बोलते नहीं है, उन्हें सुनना पडता है’

The Kashmir Files

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून अनेकजण या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. यादरम्यान मराठीतील प्रसिद्ध संगीतकार सलील कुलकर्णी यांनीही या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे.

सलील कुलकर्णी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटासंबंधित एक पोस्टर शेअर केला. यासोबत त्यांनी लिहिले की, ‘टूटे हुए लोग बोलते नहीं है…उन्हें सुनना पड़ता है …!! द कश्मीर फाईल्स’. विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी यांचा काय अनुभव आहे. काश्मीरी पंडितांचे ७००० सत्यकथांचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी खूप साऱ्या खऱ्या आणि अस्सल गोष्टी समोर आणले आहेत.

पुढे त्यांनी हिंदीतील एका म्हणीचा वापर करत लिहिले की, ‘जब तक सच जूते पहने ..झूठ दुनियाभर घुमके आता है’. काश्मीरचा सत्य सांगण्याचा हा किती अद्भुत प्रयत्न आहे. अनुपम खेर, पल्लवी जोशी आणि माझे मित्र चिन्मय मांडलेकर तुम्ही सर्वांनी खूप चांगलं काम केलं आहे. विवेक अग्निहोत्री तुम्हाला सलाम’.

नुकतीच ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही चित्रपटाच्या टीमची भेट घेऊन त्यांचे कौतुक केले. यासंदर्भातले फोटो चित्रपटाचे निर्माते अभिषेक अग्रवाल यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केले. यासोबतच पंतप्रधान मोदींना भेटणे आणि त्यांच्याकडून द कश्मीर फाईल्स चित्रपटाला मिळालेल्या कौतुकाबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले.

https://twitter.com/AbhishekOfficl/status/1502659234319667201?s=20&t=KgFsHB1S-qTstjjxPl_spA

दरम्यान, ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट १९८९-९० च्या काळातील काश्मिरी पंडितांवर भाष्य करणारा आहे. या चित्रपटात अनुपम खेर यांच्यासोबत मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी, मृणाल कुलकर्णीसुद्धा मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. तसेच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा शोमध्ये जाण्यावरूनही मोठा वाद निर्माण झाला होता.

११ मार्च रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला आणि प्रदर्शनानंतर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने ३.५५ कोटींचा बिझनेस करत चांगली सुरुवात केली होती. तसेच आताही चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून पुढील काळातही चित्रपट चांगली कमाई करेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
‘पावनखिंड’नंतर ‘हा’ ऐतिहासिक चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला; पार पडला मुहुर्तसोहळा
आई कुठे काय करते? मधील अप्पांच्या मुलीचा थाटात पार पडला विवाहसोहळा; पहा खास व्हिडिओ
सूड म्हणून ती एक दिवस आम्हाला अशी उघड्यावर पाडेल, असं वाटलं नव्हतं; कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now