Share

सैफच्या जागी आला जॉन अब्राहम, पाकिस्तानात घुसून करणार ‘हे’ काम, चाहते झाले उत्सुक

आहिस्ता आहिस्ता (2006) आणि नाम शबाना (2017) या चित्रपटांचे दिग्दर्शन केलेल्या दिग्दर्शक शिवम नायरच्या पुढील चित्रपटात सैफ अली खानच्या जागी आता जॉन अब्राहम(John Abraham) दिसणार आहे. यापूर्वी ही भूमिका सैफ करणार होता. पण सैफची जागा जॉनने घेतली आहे.(saifs-replacement-is-john-abraham-who-will-enter-pakistan-to-do-this-work)

जॉन अब्राहमकडे सध्या अनेक अॅक्शन-पोलिटिकल थ्रिलर चित्रपट आहेत. आगामी काळात तो अशाच चित्रपटांमध्ये दिसणार आहे. पण नुकतीच आलेली बातमी अशी आहे की त्याने शिवम नायरच्या पुढच्या चित्रपटात सैफची जागा घेतली आहे.

सैफ(Saif Ali Khan) हा चित्रपट करणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. पण अचानक शिवमने निर्णय बदलला आणि सैफच्या जागी जॉन आला. चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही मात्र त्याचे नाव उजमा असू शकते असे सूत्रांचे म्हणणे आहे.

हा चित्रपट भारतीय महिला उजमा अहमद(Ujma Ahmed) हिच्या सत्यकथेवर आधारित आहे. उजमाने मलेशियामध्ये ताहिर अली या पाकिस्तानी नागरिकाची भेट घेतली होती. दोघे प्रेमात पडले आणि उजमा त्याच्यासोबत पाकिस्तानला गेली. तेथे गेल्यानंतर कळले की अली विवाहित आहे आणि त्याला चार मुले आहेत.

पाकिस्तानमध्ये(Pakistan), बंदुकीच्या जोरावर उजमाचे अलीशी लग्न झाले, लैंगिक शोषण केले. शेवटी स्वत:ला वाचवण्यासाठी ती भारतीय उच्चायुक्तालयात गेली. पासपोर्ट आणि कागदपत्रांच्या समस्याही होत्या. दीर्घ कायदेशीर लढाईनंतर उजमा तिच्या देशात, भारतात परतली.

पाकिस्तानात भारतीय मुत्सद्दी असलेले जेपी सिंग आणि त्यावेळच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज(Sushma Swaraj) यांचा त्यांच्या परत येण्यात मोठा हात होता. या दोघांच्या मदतीने उजमा आपल्या देशात परत येऊ शकली.

या चित्रपटात जॉन भारतीय मुत्सद्दी जेपी सिंग यांची भूमिका साकारणार आहे. तब्बू सुषमा स्वराज यांच्यासाठी चर्चेत होती पण तिने ही भूमिका करण्यास नकार दिला. ही भूमिका कोण साकारणार हे अद्याप ठरलेले नाही. दुसरीकडे, श्रद्धा कपूरची उजमासाठी प्रथम निवड झाली होती. पण सैफप्रमाणे आता ती ही या चित्रपटाचा भाग नाही. उजमाच्या भूमिकेसाठी दिग्दर्शकही हिरोईनच्या शोधात आहे.

मनोरंजन ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now