Share

बॅालिवूडच्या पुरस्कार सोहळामध्ये सईने रोवला मराठी झेंडा; ‘IIFA’ मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्काराने गौरव

sai

मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरने (Saie Tamhankar) नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असती. तिच्या बोल्ड लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकतच सईने इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी म्हणजेच आयफा (IIFA) पुरस्कार सोहळ्यासाठी खास लूक केला होता. ते फोटो देखील सोशल मिडियावर तुफान व्हायरल आले होते.

नेहमीच चर्चेत असणारी सई आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र या वेळेस वेगळं कारण आहे. ‘मिमी’ या हिंदी चित्रपटातील भूमिकेसाठी तिला आयफा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बॅालिवूडच्या पुरस्कार सोहळामध्ये सईने मराठी झेंडा रोवला आहे.

तिच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होतं आहे.  सई ताम्हणकर हिने आयफा २०२२ मध्ये ‘सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री’ हा पुरस्कार जिंकला आहे. तिला हा पुरस्कार ‘मिमी’ या सिनेमातील ‘शमा’च्या भूमिकेसाठी मिळाला आहे. तिने या सिनेमात क्रिती सेनॉन अर्थात मिमीच्या मैत्रिणीची भूमिका साकारली आहे.

सई हिने बॉलिवूडच्या एका प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या पुरस्कारावर आपलं नाव कोरल्याने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतं आहे. यंदाचा आयफा पुरस्कार सोहळा दुबईतील अबूधाबी येथे आयोजित करण्यात आला होता. अबू-धाबीला सुरू असलेल्या IIFA सोहळामध्ये सईला मिळालेला पुरस्कार हा मराठी सिनेसृष्टीच्या प्रत्येक कलाकारासाठी आनंद देणारा ठरला आहे.

दरम्यान, शनिवारी रात्री या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. या सोहळ्याला सलमान खान, विकी कौशल, ऐश्वर्या बच्चन, अनन्या पांडे, सई ताम्हणकर यांसह इतर कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी ‘मिमी’ या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

तसेच ‘मिमी’ या चित्रपटामध्ये एका सरोगेट मदरची कहाणी दाखवण्यात आली आहे. या चित्रपटामध्ये बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनने मुख्य भूमिकेत आहे. तर सईने या चित्रपटात क्रितीच्या मैत्रिणीची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठीच सईला आयफा पुरस्कार देण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
वकील उज्ज्वल निकमांनी केले ‘सरसेनापती हंबीरराव’चे तोंडभरुन कौतूक; म्हणाले, कलाकारांनी जीव ओतलाय
नेत्यालाही घरदार संसार असतो, प्लिज हात जोडून विनंती करतो..; वसंत मोरे लोकांवर का भडकले? जाणून घ्या..
‘या’ शहरातून रचला सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा प्लॅन; पोलिसांच्या हाती आले मोठे पुरावे, दोन जण ताब्यात
राज ठाकरेंचा अयोध्या दौरा त्यांच्या पठ्ठ्याने केला पूर्ण; अविनाश जाधव अयोध्येत

इतर ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now