Share

सईला मिळाला लाईफ पार्टनर? ‘या’ व्यक्तीसोबतचा फोटो शेअर करत म्हणाली, ‘साहेब दौलतराव सापडले’

Sai Tamhankar

मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड ॲन्ड ब्युटीफल अशी ओळख असणारी अभिनेत्री म्हणजेच सई ताम्हणकर (Sai Tamhankar). अभिनयासोबत आपल्या अदा, स्टाईल आणि लूकसाठी प्रसिद्ध असलेली सई आपल्या बिनधास्त अंदाजामुळेही नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावरही ती नेहमी सक्रिय असत याद्वारे अनेक पोस्ट शेअर करत असते. सध्या सई तिच्या एका पोस्टमुळे माध्यमात चांगलीच चर्चेत आहे. सईच्या या पोस्टनंतर ती तिच्या या पोस्टनंतर सईला तिचा लाईफ पार्टनर भेटला की काय? अशी चर्चा सुरु झाली आहे.

सईने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर एका मिस्ट्री मॅनचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, मी कशाप्रकारे तुझ्या चेहऱ्यावर तेज आणते ना..’. यासोबत सईने #saheb #daulatrao #sapadla असे हॅशटॅगही वापरले आहेत. सईने या फोटोत मिस्ट्री मॅनला टॅगसुद्धा केला आहे.

https://www.instagram.com/p/Cb9Xvknsmeo/

सईने ही पोस्ट शेअर करताच त्यावर चाहते कमेंटचा वर्षाव करत तिला अनेक प्रश्न विचारत आहेत. हा व्यक्ती कोण आहे? नक्की आम्ही काय समजावं? लाईफ पार्टनर आहे का? असे अनेक प्रश्न चाहते तिला विचारत आहेत. तर सईच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केली आहे. प्रिया बापट, प्रार्थना बेहेरेस वैभव तत्त्ववादी, मृण्मयी गोडबोले, सुयश टिळक या सर्वांनी तिच्या या पोस्टवर हार्टच्या इमोजी शेअर केले आहेत.

तर सईने ज्या व्यक्तीचा फोटो शेअर केला आहे त्याचे नाव अनीश जोग असे आहे. अनीशसुद्धा कलाक्षेत्राशी संबंधित असून तो चित्रपट निर्माता आहे. त्याने आतापर्यंत गर्लफ्रेंड, वायझेड, मुरांबा, धुराळा, टाईमप्लीज, डबलसीट अशा चित्रपटांची निर्मिती केली आहे.

अनीश जोगचे इन्स्टाग्राम हँडल पाहिल्यास त्यानेही यापूर्वी सईसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्याने सईला टॅग करत ‘मॅजिक! तू आणि मी’ असे कॅप्शन दिले आहे. तर त्याच्या या पोस्टवरही अनेक सेलिब्रिटींनी हार्टच्या इमोजी शेअर केल्या आहेत. तर यावरून सई आणि अनीश रिलेशनशीपमध्ये असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. परंतु अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

https://www.instagram.com/p/CamMD13JRIA/

रंगभूमीपासून सुरुवात करून सईने बॉलिवूडपर्यंत मजल मारली आहे. सईच्या आईच्या मित्राने दिग्दर्शित केलेल्या नाटकातून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यानंतर अनेक मालिका आणि चित्रपटांमधून सईने रसिकांची मने जिंकली आहेत. आपल्या अभिनयाच्या जोरावर सईने आज सिनेसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

सईने ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर ‘अग्निशिखा’, ‘अनुबंध’ ‘सती रे’ या मराठी मालिकेत तर हिंदीतील एकता कपूरच्या ‘कस्तुरी’ या मालिकेत तिने काम केले. ‘सनई चौघडे’ या चित्रपटाद्वारे तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले.

त्यानंतर ‘झकास’, ‘अजब लग्नाची गजब गोष्ट’, ‘पुणे ५२’, ‘बालक-पालक’, ‘प्यारवाली लव्हस्टोरी’, ‘टाईमप्लीज’, ‘दुनियादारी’, ‘क्लासमेट’, ‘वायझेड’ अशा अनेक चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारत तिने आपले अभिनय कौशल्य दाखवले. त्याचसोबत ‘गजनी’,‘हंटर’, ‘मिमी’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमावत तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. नाटक, मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून सईची कारकीर्द बहरत गेली. त्यानंतर तिने ‘डेट विथ सई’ या वेबसिरिजच्या माध्यमातून डिजिटल माध्यमात प्रवेश केला.

महत्त्वाच्या बातम्या :
अजय देवगण बनवणार ४०० कोटींची मेगा बजेट फिल्म, वाचा काय होणार त्याचे साईड इफेक्ट्स
VIDEO: करण जोहरने भारती-हर्षच्या मुलाला लॉन्च करण्यास दिला नकार, मग सलमानने घेतला पुढाकार
बॉलीवूडमधील ‘या’ अभिनेत्यामुळे अभिषेक-ऐश्वर्या आले जवळ; नाव वाचून तुम्हालाही बसणार नाही विश्वास

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now